लोकमत न्यूज नेटवर्करावेत : सर्वच महाविद्यालये, शाळा सुरू झाल्या असून, विद्यार्थ्यांमुळे शालेय व त्यांच्या आजूबाजूचा परिसर गजबजलेला आहे. सुरुवातीलाच अनेक शाळा व महाविद्यालया समोर महाविद्यालयीन युवतींना व मुलींना रोडरोमिओच्या छेडछाडीला सध्या सामोरे जावे लागत आहे. त्याच्या तक्रारी शालेय प्रशासन आणि पोलीस विभागाला देऊनसुद्धा काहीही परिणाम होत नाही. यामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. छेडछाडीच्या प्रकरणामुळे मुलींना शिक्षण द्यायचे की नाही ही पालकांना चिंता लागून राहिली आहे. विद्यार्थिनींची रोडरोमिओंकडून नेहमी छेड काढली जाते. विशेषत: या शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांपेक्षा शाळाबाह्य रोडरोमिओंचा जास्त त्रास होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. विद्यार्थिनी रस्त्याने जात असल्यास रोडरोमिओ वेगाने गाडी चालवून त्यांना कट मारतात. अनेकदा चित्रविचित्र हावभाव करणे, इशारे करणे किंवा अश्लील शब्द उच्चारून छेड काढण्याचे प्रकार घडत आहेत. शाळा-महाविद्यालयांच्या रस्त्यावर असे प्रकार नेहमीच दिसून येतात. जवळपास सर्वच शैक्षणिक संस्था तसेच कोचिंग क्लासेस परिसरात छेडछाडीचे प्रकार होतात. हा सर्व प्रकार शैक्षणिक संस्थांच्या परिसरात सुरू असूनही संबंधित संस्थाचालकांचे कानावर हात आहेत. पालक मुलींची बाजू असल्यामुळे हतबल असल्याचे दिसून येत आहे. मुलींचे छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी विशेष उपक्रम राबवावेत. प्रत्येक शाळा, महाविद्यालयात तक्रारपेटी सीसीटीव्ही बसवण्याची गरज आहे. या तक्रारपेटीत लैंगिक शोषण, छेडछाडीविरोधात विद्यार्थिनींनी तक्रारी कराव्यात. या पेट्या महिन्यातून किमान एकदा उघडून तक्रारींवर उपाययोजना करायला हव्यात. हे करताना मुलीचे नाव गोपनीय राहील, याची दक्षता घ्यायला हवी. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण पाहून उपद्रव करणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई व्हायला हवी. सध्या काही मोजक्याच शाळा महाविद्यालयांत अशा तक्रारपेट्या, सीसीटीव्ही बसवलेले आहेत.शाळेमधील विद्यार्थ्यांशी मैत्री वाढवून ते विद्यार्थिनींशी लगट करण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थिनींनी विरोध केला की छेड काढतात. अठरा वर्षांखालील टवाळखोरांकडे वाहन चालवण्यास परवानागी नसते. त्यासाठी पोलिसांनी छेडछाडीविरोधी पथक स्थापन करण्याची गरज आहे. कारण आज शाळा, महाविद्यालय क्लासेसमध्ये जाणाऱ्या मुली प्रचंड दहशतीखाली आहेत. शैक्षणिक संस्था : रोडरोमिओंचा त्रास शाळा, महाविद्यालये सुरू झाली की रोडरोमिओंचा त्रास सुरू होतो. त्यामुळे जून महिन्यापासून निर्भया, दामिनी पथके कार्यरत होतात. या भागात ही अशी विशेष पथके आहेत. पण शहरातील शैक्षणिक संस्थांची संख्या आणि पोलीस पथकांचे मनुष्यबळ यामध्ये कमालीची विसंगती आहे. शिवाय एकाच वेळी ही पथके सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊ शकत नाहीत. त्यामुळे रोडरोमिओंचे फावत आहे. पोलिसांचे वाहन पाहताच रोडरोमिओ पळ काढतात. पोलीस चक्कर मारून निघून गेले, की पुन्हा रोडरोमिओंचेच राज्य असते. बहुतांश शैक्षणिक संस्थांमध्ये असेच चित्र दिसत आहे.खासगी क्लासवाल्यांचीही वाढली चिंता४रोडरोमिओंचा कायम शाळा, महाविद्यालये कोचिंग क्लास परिसरात वावर असतो. शाळा आणि खासगी क्लास सुटण्याच्या वेळेवर त्यांचे लक्ष असते. वेळेपूर्वीच ते हजर होतात. विद्यार्थिनी एकटी असेल, तर टवाळखोर तिची छेड काढतात. बहुतांश शैक्षणिक संस्थांमध्ये शहरातील ठराविक भागातील युवक टोळके करून उभे राहतात. त्यांच्याशी पंगा घेण्यास इतर विद्यार्थी घाबरतात. एखाद्या मुलीने पालकांना सांगितल्यास पालक तिला आजच्या दिवस शाळेत जाऊ नको, असे सांगून तिची समजूत काढतात. त्यामुळे रोडरोमिओंना चाप लागणे दूरच, पण विद्यार्थिनींमध्येच दहशत निर्माण झाली आहे.चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या शाळा, महाविद्यालय, क्लासेस आदी ठिकाणी भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस मार्शल व बिट अधिकारी पेट्रोलिंग करीत आहेत़ ज्या ठिकाणी अशा प्रकारची मुले आढळून येतात त्यांच्यावर कारवाई केली आहे़ त्यामुळे आमच्या हद्दीत छेडछाडीच्या प्रकाराला आळा बसला आह़े महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी जवळपास २००० ते २५०० महिलांचा बडी कॉप च्या माध्यमातून ग्रुप तयार करीत आहोत, त्यावरती तक्रार नोंदविल्यास तत्काळ मदत मिळेल.विठ्ठल कुबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चिंचवड पोलीस स्टेशऩ
टवाळखोरांचा विद्यार्थिनींना त्रास
By admin | Published: July 02, 2017 2:24 AM