शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

धडाकेबाज निर्णयांची वादग्रस्त कारकीर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 1:01 AM

पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) गती देण्यासाठी धडाकेबाज निर्णय घेणारे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची अखेर बदली झाली आहे.

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) गती देण्यासाठी धडाकेबाज निर्णय घेणारे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांची अखेर बदली झाली आहे. कर्मचाºयांना शिस्त लावण्यापासून ते राजकारण्यांचा हस्तक्षेप पूर्ण थांबवून टाकणाºया मुंढे यांची १० महिन्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली.मुंढे यांनी २९ मार्च २०१७ रोजी पीएमपीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. पहिल्या दिवसापासूनच त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. कर्जाच्या गर्तेत रुतलेल्या पीएमपीला मार्गावर आणण्यासाठी कर्मचाºयांमधील बेशिस्तपणा त्यांनी मोडून काढला. कामचुकार कर्मचाºयांना ठिकाणावर आणले. एक कंपनी म्हणून पीएमपीचे कामकाज चालावे, यासाठी मोठे प्रशासकीय बदल केले. अगदी वरिष्ठ अधिकाºयांवरही कारवाई केली.मुंढे यांनी मार्गांचे सुसूत्रीकरण, नवीन मार्ग सुरू करणे, बीआरटी सेवेला गती देणे, ब्रेक डाऊन कमी करण्यासाठी गाड्यांची योग्य प्रकार देखभालीची सोय, रात्रपाळीत झोपणाºया कर्मचाºयांचे निलंबन, ओव्हरटाईम बंद, नवीन आस्थापन आराखडा तयार करणे अशी महत्त्वपूर्ण कामे केली. मात्र, कर्मचाºयांच्या कामाच्या वेळेत बदल, उशिराने येणाºया कर्मचाºयांना त्या दिवसाचा पगार न देणे, हेतूपुरस्सर बदली केलेल्या कर्मचाºयांची पुन्हा मूळ ठिकाणी बदली, बेकायदेशीरपणे केलेली पदोन्नती, कामचुकार अधिकारी व कर्मचाºयांची बदली-निलंबन व बडतर्फीची कारवाई त्यांनी केली. तब्बल १५८ कंत्राटी कर्मचाºयांना सेवामुक्त केले. ३७५ कायम कर्मचारी आणि १५० रोजंदारीवरील वाहकांची कामातील अनियमिततेप्रकरणी चौकशी सुरू केली. यामुळे कर्मचारीही नाराज होते.हे सगळे करताना पीएमपीमधील राजकीय हस्तक्षेप त्यांनी पूर्णपणे बंद केला. पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच मुंढे यांचे पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांतील पदाधिकाºयांशी खटके उडू लागले. लोकप्रतिनिधींना सन्मानाने वागणूक देत नसल्याचा आरोप त्यांच्यावर होऊ लागला. सर्वसाधारण सभांमध्ये अनेक नगरसेवकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकाºयांनीही मुंढे यांची कार्यशैली हिटलरप्रमाणे असल्याचे म्हटले होते. दुसºया बाजुला कामगार संघटनाही मुंढे यांच्या विरोधात गेल्या होत्या. राष्टÑवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस प्रणित पीएमपी कामगार संघटनांची कार्यालये त्यांनी पीएमपीच्या इमारतीतून हटविली.पदाधिकाºयांच्या आग्रहाखातर सुरू करण्यात आलेले तोट्यातील मार्ग, पास केंद्रही त्यांनी बंद केले. कर्मचारी संघटनांनाही त्यांनी अनधिकृत ठरविले. त्यामुळे सर्वपक्षीय राजकारणी त्यांच्या विरोधात गेले होते. संचलन तुटीपोटी पीएमपीला मिळणारा निधी घेण्यासाठी मुंढे यांना पालिकेत येऊन बोलावे लागेल, अशी भूमिका अनेक नगरसेवकांनी घेतली होती. मात्र मुंढे यांनी त्यास नकार दिल्याने त्यांच्यावर अनेक नगरसेवक नाराज झाले होते. त्या वेळेपासूनच मुंढे यांची बदली करण्याची मागणी होत होते. तसेच मंगळवारी पुण्यातील काही नगरसेवक आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी मुंढेबाबत नाराजी व्यक्त केली होती. नवीन आस्थापन आराखडा आणि पीएमपीच्या नियमांवर बोट ठेवत कर्मचाºयांची कोंडी केल्याने त्यांना होणार विरोध वाढतच होता.त्यामुळे वरिष्ठ नेत्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे हा विषय पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात होते. विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधींसह कर्मचारी संघटनाही आता मुंढे यांच्या बदलीसाठी प्रयत्न करत होत्या. त्यातूनच मुंढे यांची बदली करण्यात आली, असे बोलले जात आहे.>मुंढेबाबत अधिकाºयांमध्ये होती नाराजीपीएमपीच्या विकासात अडथळा ठरणाºया प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्टोक्ती केल्यानंतर महामंडळातील काही अधिकाºयांनादेखील घाम फुटला होता. वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांची पदानवती, सुनील गवळी व १४ टाईम किपरची हकालपट्टी, अनेक वरिष्ठ अधिकाºयांच्या बदल्या, बस वेळेत न जाणे-ब्रेकडाऊन होणे-ठरलेल्या नियोजनाप्रमाणे संचलन न झाल्याने अधिकारी व डेपो मॅनेजरांना करण्यात आलेला दंड आणि सहव्यवस्थापक डी. पी. मोरे यांची बदली, अशा विविध कारणांसाठी पीएमपीतील अनेक अधिकारीदेखील मुंढे यांच्यावर नाराज होते. काही अधिकारी तर येथून बदली करा, अशी मागणीदेखील शासनाकडे करीत होते.>वादग्रस्त निर्णयपासेसच्या किमतीमध्ये वाढनगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांचे पीएमपीतील आॅफिसखाली करणेकर्मचारी संघटनांचे कार्यालय खाली करणेबस ठेकेदारांना दंडनवीन आस्थापना आराखडादिवाळी बोनस न देण्याची भूमिकामहिन्याला एकच दिवस सुटीप्रस्तावित निर्णयप्रत्येक मिनिटाला मीडी बसचालक व वाहकांना बस देण्यासाठी अ‍ॅटोमॅटिक यंत्रणामीडीबसच्या जाळ्याचा विस्तारनवीन अ‍ॅटोमॅटिक बसची खरेदी>नियमबाह्य बदलीमुंढे यांनी पीएमपीच्या अध्यक्षपदी रुजू होऊन साधारण १० महिन्यांचा तर देशभ्रतार यांना अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार घेऊन साधारण २२ महिने (२ वर्षाला २ महिने बाकी) झाले आहेत. तरीही दोघांची बदली करण्यात आली व महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना ३ वर्षांपेक्षा अधिक तर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनाही साडेतीन वर्षांपेक्षा अधिक काळ होऊनही त्यांची मात्र बदली झालेली नाही.>मुंढे यांचे काही निर्णय व कामेउशीराने येणाºया कर्मचाºयांना त्या दिवसाचा पगार न देणेइतरत्र काम करणाºया १७८ कर्मचाºयांची पुन्हा पीएमपीत बदलीआॅन ड्युटी डुलकी घेणाºयांचे निलंबनमालकीच्या अधिकाधिक गाड्या मार्गावर आणणे१०० बसेसची पुनर्बांधणीओव्हरटाईम बंदप्रवाशांशी गैरवर्तन करणाºयांना निलंबितपीएमपीचे ई-कनेक्ट अ‍ॅप तयार करणेवेबसाईटचे अद्ययावतीकरणकागदी पासऐवजी मी-कार्डआयटीएमएसची प्रभावी अंमलबजावणीशिफ्टमध्ये कामकाजाचे नियोजनचालक व वाहकाला फिक्स बस देणेकामाप्रमाणे बढती व पगारवाढस्वारगेटला पीएमपीसाठी स्वतंत्र लेनजाहिरातीचे कंत्राट रद्दपर्पल मोबिलिटी सोल्यूशनची सेवा थांबविलीव्हीएचएमएसद्वारे बसची तपासणीबीआरटीमध्ये घुसखोरी करणाºयांना दंड

टॅग्स :Puneपुणेtukaram mundheतुकाराम मुंढे