पुणे : शुक्रवारच्या पुणे भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणी फार खूश व कोणी फार नाराजही होणार नाही याची काळजी घेतलेली दिसते आहे. तरीही या भेटींमधून त्यांनी काहीजणांना सुप्त इशारे दिले असल्याचे बोलले जात आहे. त्यांचे खासदार संजय काकडे यांच्या घरी जाणे व तिथे आरती करणे तर पक्षाच्या वतुर्ळात सर्वाधिक चचेर्चा विषय झाले आहे. योग्य, अयोग्य अशी दोन्ही मते त्यावर व्यक्त होत आहेत. खासदार काकडे यांनी लोकसभेच्या निवडणूकीत पक्षाकडे पुण्यातून उमेदवारी मागितली होती. ती मिळत नाही असे लक्षात आल्यावर त्यांनी काँग्रेसचे दरवाजे ठोठावले. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली होती, तसेच पक्षाच्या अन्य कोणत्याही उमेदवारापेक्षा मी जास्त मतांनी निवडून येईल असेही वक्तव्य केले होते. मात्र त्यानंतर एकदम घुमजाव करत त्यांनी पक्षाच्या प्रचारात लक्ष घातले. मुख्यमंत्र्यांबरोबर असलेल्या निकटच्या संबधांचा वारंवार उल्लेख केला. याच संबधांवर त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना घरी नेल्याचे सांगितले जाते. पक्षाच्या वतुर्ळात या भेटीबाबत ह्यत्यांनी जायला नको होतेह्ण व ह्यते मुद्दाम गेले, त्यातून त्यांना काहींना समज द्यायची होतीह्ण अशा दोन्ही बाजूंनी बोलले जात आहे. प्रदेशाध्यक्षांपासून सर्वांवरच कायम टीका केली तरीही त्यांना हा सन्मान कशासाठी, त्यातून चुकीचा संदेश गेला असल्याचे मत पक्षाचे काही ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी व्यक्त करत आहेत. तर काहीजणांना मुख्यमंत्र्यांना यातून खासदार गिरीश बापट यांना इशारा द्यायचा होता असेही वाटते आहे. ह्यपुणे शहरात आपणच पक्षाचे सर्वेसर्वा आहोतह्ण या बापट यांच्या समजाला धक्का लावण्यासाठी म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी असे केलेअसल्याचे सांगण्यात येते आहे. धीरज घाटे व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ या पक्षाच्या दोन नगरसेवकांच्या गणेश मंडळांनाही मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. मानाचे पाच गणपती वगळतात्यांनी भेट दिलेली फक्त हीच मंडळे आहेत. यातील घाटे यांनी कसबा विधानसभेतून तर मोहोळ यांनी कोथरूडमधून पक्षाकडे विधानसभेची उमेदवारी मागितली आहे.ह्णत्यामुळेच निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीचा चुकीचा अर्थ निघेल हे लक्षात घेत मोहोळ ज्यांना डावलून विधानसभेची उमेदवारी मागत आहेत त्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचाही एक कार्यक्रम स्वीकारला. त्यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन त्यांनी स्वहस्ते केले. तसेच घाटे यांच्या मंडळाला भेट देतानाच त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागणाºया महापौर मुक्ता टिळक यांनाही बराच वेळ दिला. अन्य कुठेही भाषण न करता त्यांनी ते केसरीवाड्यातच केले.
सगळे इशारे बरोबर, एकावरून मात्र भाजपात संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2019 9:59 PM
शुक्रवारच्या पुणे भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणी फार खूश व कोणी फार नाराजही होणार नाही याची काळजी घेतलेली दिसते आहे.
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे गणेशदर्शन टीकेनंतरही दिला गृहभेटीचा सन्मान