शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

'ही' पुण्याची खरी संस्कृती! काँग्रेसच्या वर्धापनदिनाला भाजपा पदाधिकाऱ्यांची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 2:19 PM

प्रेम नसेल तर नसू द्या पण वैर नको; ही पुण्याची खरी संस्कृती! काँग्रेसच्या वर्धापनदिनाला भाजपा पदाधिकाऱ्यांची हजेरी..

पुणे: काँग्रेसच्या १३५ वर्धापनदिनाला भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट यांंनी पक्षाच्या महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेत सोमवारी सकाळी थेट काँग्रेस भवनात हजेरी लावली. प्रेम नसले तर नसू द्या पण वैर नको, ही पुण्याची खरी संस्कृती आहे, असे म्हणत बापट यांनी काँग्रेसला शुभेच्छा दिल्या. 

खासदार बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह भाजपा नगरसेवक, कार्यकर्ते यांचा भला मोठा ताफाच काँग्रेस भवनमध्ये हजर झाला. शहराध्यक्ष रमेश बागवे यांंनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर हास्यविनोदाची मैफलच बापट व बागवे यांनी जमवली. त्यांना बीडकर, मोहोळ व काँग्रेसकडून अविनाश बागवे, रमेश अय्यर, अजित दरेकर, रवींद्र माळवदकर वगैरे मंडळींनी साथ दिली. 

बापट म्हणाले.; पक्ष कार्यकर्ते पक्षासाठी काम करत असतात. ते करताना मतभेद होतातच, पण ते वैचारिक असावेत. पुण्यात हे नेहमी पाळले जाते. तीच पुण्याची संस्कृती आहे. वेगवेगळ्या पक्षांमध्ये असलो तरी आपण एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होतो ते असेच कायम राहिले पाहिजे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाणयांचीही प्रत्यक्ष काँग्रेसभवनाला भेट .... भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार वंदना चव्हाण यांनी देखील काँग्रेसभवनाला दाखल झाल्या. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे  यांच्यासह काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBJPभाजपाgirish bapatगिरीष बापट