पुणे : सण-समारंभांसाठी होणारा खर्च टाळून गरजूंना मदतीचा हात देण्याकरिता मोजकेच लोक पुढाकार घेतात. तावरे दाम्पत्याने संसार सुरू करतानाच रायगड किल्ले परिसरातील मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी उचललेले पाऊल युवकांना आदर्श ठरेल असे आहे. आम्ही शिवछत्रपतींच्या रक्ताचे वारस असलो, तरी अशा कार्यांमधून शिवरायांचे नवे वारस तयार होत आहेत, असे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीमहाराज यांनी केले.निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे रायगड परिसरातील ५० विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. त्या उपक्रमाला हातभार लावत संस्थेचे विराज तावरे आणि केतकी तावरे यांनी लग्न साध्या पद्धतीने केले आणि रायगड परिसरातील गरजू मुलांच्या शिक्षणाकरिता आर्थिक मदत दिली. विनायक निम्हण, विकास पासलकर, उमेशचंद्र मोरे, जयेश कासट, सचिन मिणीयार उपस्थित होते.
...हेच खरे शिवरायांचे वारसदार
By admin | Published: February 25, 2017 2:35 AM