पुणे : कोरोना संकटाचा फटका समाजातील सर्वच घटकांना फटका बसला. पौरोहित्य आणि कीर्तनकारांना याची झळ बसली. या वर्गालाही संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून निधी उभारून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आधार देण्यासाठी सार्वजनिक विश्वस्त संस्था स्थापन करावी. त्यास सर्वतोपरी मदत करू, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने कीर्तनकार आणि पौरोहित्य करणाऱ्यांना ‘एक हात मदतीचा’ अंतर्गत शिधा वाटप करण्यात आले. या वेळी पाटील बोलत होते. फाउंडेनशचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले. परशुराम सेवा संघाचे विश्वजित देशपांडे यांनी आभार मानले.
फाउंडेशनचे संस्थापक आणि शहर भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, कोथरूड मंडल युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे, याज्ञवल्क आश्रमाचे मोहनराव मुंगळे, कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे प्रमोदराव शेजवलकर, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेेचे विश्वनाथ भालेराव, महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे अतुल व्यास, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे डॉ. अरुण हुपरीकर, ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या अॅड. ईशानी जोशी, ‘आम्ही सारे ब्राह्मण’चे भालचंद्र कुलकर्णी, ब्राह्मण महासंघाचे मनोज तारे, मदनजी सिन्नरकर, विप्र संघाचे मयुरेश अरगडे, कीर्तनकार हर्षद जोगळेकर, जयश्री देशपांडे, गहुंजे ब्राह्मण संघाचे सुशील नगरकर, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे सतीश कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.