---
भोर : पंचायत समितीच्यावतीने कचरामुक्ती अभियान राबवले जात आहे, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. मात्र, भोर तालुक्यात रस्त्यावर पडणारे प्लॅस्टिक व कचरा राहणार नाही, यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
वडागावडाळ ते आंबेघरदरम्यान सुमारे ७ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन खासदार सुळे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर भोर पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या कोरोनासह पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, महसूल, कृषी विभाग, वनविभाग, सहकार, विद्युत वितरण कंपनी, पोलीस यांसह सर्व विभागांच्या आढावा घेतल. या वेळी जि. प. उपाध्यक्ष रणाजित शिवतरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विक्रम खुटवड, उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे, विजयकुमार थोरात, संतोष चव्हाण, भालचंद्र जगताप, संतोष घोरपडे, चंद्रकांत बाठे, नितीन धारणे, वंदना धुमाळ, विठ्ठल शिंदे, शलाका कोंडे, अमोल पांगारे, यशवंत डाळ, सुहित जाधव, संदीप नांगरे उपस्थित होते.
या वेळी गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी सांडपाणी व्यवस्थापन, कचरामुक्त अभियान, बोलक्या अंगणवाड्या, रोजगार हमीची कामे याची माहिती दिली. तहसीलदार अजित पाटील यांनी निर्सग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आढावा दिला. वीजवितरण कंपनीच्या नवीन पोल बदलणे, दुरुस्त करणे, डीपी बदलणे याची माहिती उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण यांनी दिली. प्रवीण मोरे यांनी कोरोना काळात भोर पोलिसांनी केलेल्या कामाची माहिती दिली.
कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून भोर तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा व अंगणवाड्या बंद आहेत. त्यामुळे वीज बिले थकलेली असल्यामुळे वीजवितरण कंपनीने कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. यावर जिल्हा परिषदेने उपाययोजना करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांनी केली. भोर शहराची लोकसंख्या १८ हजार आहे. मात्र, शहरातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र नाही.
त्यामुळे लोकांची अडचण होत आहे. नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी केली. यावर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी जिजामाता शाळेत शहरासाठी नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
हातवे-तांभाड रस्त्याचे मागील दोन वर्षांपासून का रखडलेले आहे? काम सुरू का होत नाही? भोर तालुक्यात नवीन झालेल्या कामाच्या साईडपट्यांवर मुरूम टाकला जात नाही? यामुळे रस्ता तुटतो आणि अपघात घडतात, अशी माहिती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विक्रम खुटवड सांगितले.
--
कोट
लस आणि सुसज्ज प्रसूतिगृहाची सोय करा
भोर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू केल्याने ग्रामस्थांची सोय झाली आहे. मात्र सर्पदंश, रेबीज लस आणि प्रसूतीसाठी अनेक महिला व रुग्णांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे लस आणि प्रसूतीसाठी योग्य नियोजन करण्याची मागणी माजी सभापती संतोष घोरपडे यांनी केली.
--
फोटो १६ भोर पंचायत समिती सुप्रिया सुळे
फोटो क्रमांक : भोर पंचायत समितीत आढावा बैठक घेताना खासदार सुप्रिया सुळे.