पुणे : शहरात सोमवारी ??????१०७ कोरोनाबाधित आढळून आले असून, २३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ५० संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.९४ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या १ हजार ८८७ सक्रिय रुग्ण आहेत. तर दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २ जण हे पुण्याबाहेरील आहे. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या ही १९१ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २६६ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३२ लाख ४४ हजार ७४४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९८ हजार ४६८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, यापैकी ४ लाख ८७ हजार ५९८ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९८३ जणांचा मृत्यू झाला आहे.