पुणे : शहरात मंगळवारी नव्याने २९७ कोरोनाबाधित आढळून आले असून, ५२९ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत़ सद्य:स्थितीला शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ हजार ६९९ इतकी आहे़
आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ५२ संशयितांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ५़ ८७ टक्के इतकी आहे़ तर आज २४ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १२ जण हे पुण्याबाहेरील असून, शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ७८ टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार: शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या १ हजार १७८ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही ५८९ इतकी आहे़ शहरात आत्तापर्यंत २५ लाख ४८ हजार ८२५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७२ हजार ७२८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी ४ लाख ६० हजार ६०७ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ तर आतापर्यंत ८ हजार ४२२ जणांचा मृत्यू झाला आहे़
-----------