लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना तपासणीच्या एकूण संख्येपैकी कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण मंगळवारी पुन्हा १३ टक्क्यांवर गेले असून, आज दिवसभरात ४१६ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ गेल्या तीन दिवसांपासून कमी झालेली कोरोनाबाधितांची वाढ आज पुन्हा चारशेच्यावर गेली आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी सहापर्यंत करण्यात आलेल्या ३ हजार ५३ संशयितांच्या तपासण्यांमध्ये ४१६ कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे़ तर दिवसभरात २१८ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील सक्रिय रूग्ण संख्याही पुन्हा ५ हजाराच्या पुढे गेली असून, आजमितीला शहरात ५ हजार ११० सक्रिय रूग्ण आहेत़
शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ४१९ गंभीर रूग्णांवर उपचार सध्या उपचार सुरू असून, यापैकी २५२ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ तर १ हजार १०१ रूग्णांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ आज दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत़
पुणे शहरात आत्तापर्यंत ७ लाख ९५ हजार ५७१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे़ यापैकी १ लाख ६७ हजार ६०४ जण पॉझिटिव्ह आले असून, यातील १ लाख ५८ हजार ५४ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ तर आत्तापर्यंत ४ हजार ४४० जणांचा मृत्यू झाला आहे़
----------------------------------