लोणी कंद : चिंचवड परिसरातील माहिती अधिकार कार्यकर्ते तुकाराम गोविंद चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी बाळासाहेब भागवत (वय ५०) व संघर्ष भागवत (वय २१) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चव्हाण यांची पत्नी मेघा चव्हाण यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भागवत हे अखिल भारतीय घिसाडी संघाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या घरामध्ये जमिनीच्या संदर्भात काही खासगी वाद सुरू होते. त्यामुळे त्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांच्या पतीने आत्महत्या केली. त्यांना मानसिक त्रास देण्यास बाळासाहेब भागवत व त्यांचा मुलगा संघर्ष हे जबाबदार आहेत. त्यांच्या त्रासाला कंटाळूनच चव्हाण हे आत्महत्येस प्रवृत्त झाले, असा आरोप त्यांनी केला आहे. लोणी कंद येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आरटीआय कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर चिंचवड परिसरात व पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. सतीश शेट्टी प्रकरणानंतर आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याने दबावामुळे ही आत्महत्या झाली आहे का, याविषयीची चर्चा होती.
तुकाराम चव्हाण आत्महत्येप्रकरणीदोघांवर गुन्हा
By admin | Published: March 19, 2016 2:40 AM