लोकमत न्यूज नेटवर्कभवानीनगर : काटेवाडी येथील मेंढ्यांचे रिंगण पार पडल्यानंतर मार्गस्थ झालेला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांचा पालखी सोहळा सायंकाळी इंदापूर तालुक्यातील पहिल्या मुक्कामासाठी सणसर येथे दाखल झाला. भवानीनगर, सणसर येथे सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले.इंदापूर तालुक्यात प्रवेश केल्यानंतर भवानीनगर येथे पालखीरथाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सारथ्य केले. या वेळी संचालक अमोल पाटील, त्यांच्या पत्नी वैशाली पाटील यांच्या हस्ते तुकोबारायांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आमदार भरणे यांच्यासह पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रवीण माने, पंचायत समिती सभापती करण घोलप, प्रांताधिकारी हेमंत निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, तहसीलदार श्रीकांत पाटील, श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सणसरच्या सरपंच संध्या काळे, उपसरपंच अभयसिंह निंबाळकर, ‘छत्रपती’चे संचालक रणजितसिंह निंबाळकर, प्रदीप निंबाळकर, गणेश झगडे, राजेंद्र गावडे, शरद कांबळे, निवास कदम, युवराज रणवरे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य माऊली चवरे, विक्रमसिंह निंबाळकर, कार्यकारी संचालक जी. एम. अनारसे, नानासाहेब शेंडे, गजानन वाकसे, महारुद्र पाटील, सागर भोईटे, रामचंद्र निंबाळकर, श्रीनिवास कदम, नानासाहेब निंबाळकर, बाबाजी निंबाळकर, विजयसिंह निंबाळकर आदींनी सोहळ्याचे स्वागत केले.
तुकोबांचा सोहळा इंदापूर तालुक्यात दाखल
By admin | Published: June 26, 2017 3:35 AM