तळेघर - श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शन करून परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या मुंबई येथील भाविकांच्या बसला अपघात झाला. त्यामध्ये तिघे गंभीर, तर नऊ जण किरकोळ जखमी झाले. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमरास तळेघर येथील तिटकारेवस्ती येथे घडली.जखमींची नावे अशी: संतोष शाम सुंदर पाटोळे (वय २४), संदेश शामसुंदर पाटोळे (वय २८), ज्योत्स्ना जयसिंग शिर्के (वय ४५) हे गंभीर, तर गौरव भरत पाटोळे (वय १६), तन्वी किशोर बने (वय १२), मिनल मिलिंद सुर्वे (वय ५१), स्नेहल जयसिंग शिर्के (वय १६), ओम पाटोळे (वय ११), वैशाली बाबाजी बने (वय ६०), जयसिंग शिवराम शिर्के (वय ४९), धीरज बाबाजी बन्ने (वय ४३), सुमीत्रा सहदेव आडकर (वय ७०) किरकोळ जखमी आहेत. सर्व राहणार मुंबई विक्रोळी येथील रहिवाशी आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : अंधेरी येथील विशाल ट्रॅव्हल या कंपनीची बस (एमएच ०४ एफके ९२८८) मधून २९ भाविक भीमाशंकर येथे भाविक दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यावर ते परतीच्या प्रवासाला निघाले होते. बस तळेघर हद्दीतील तिटकारेवस्ती येथे आली असताना गाडीचा ब्रेक निकामी झाला.चालकाचा गाडीवरील ताबा सुटला त्यामुळे गाडी विरुद्ध दिशेने वळाली. समोर विद्युत पुरवठा करणारा विजेचा खांब असल्यामुळे चालकाने प्रसंगवधान राखुन बस भातशेतामध्ये घातली. त्यामुळे बस पूर्ण उलटली.अपघातचा अंदाज आल्यामुळे बसमधील प्रवाशी सावध झाले होते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. जखमींना तातडीने घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले, तर तीन जखमीना मंचर येथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
तळेघर जवळ बसला अपघात बारा जखमी, भीमाशंकरवरून येणाऱ्या भाविकांची बस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 12:52 AM