पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेसाठी निवडण्यात येणाºया परीक्षार्थीसाठीच्या नियमावलीत बदल केला आहे. त्यानुसार यापुढील काळात होणा-या पूर्वपरीक्षांमधून मुख्य परीक्षेसाठी प्रवर्गानुसार प्रत्येक पदामागे १२ परीक्षार्थींची निवड केली जाणार आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणाºया उमेदवारांची संख्या वाढणार आहे.आयोगाने ‘द महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन रुल्स आॅफ प्रोसिजर २०१४’ यामध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार निवडीचा नियम बदलण्यात आला असून, ते राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. पूर्वी एकूण पदांच्या ८ आणि १० पट या निकषानुसार परीक्षार्थी मुख्य परीक्षेसाठी निवडले जात होते. मात्र, मुख्य परीक्षेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी देण्याच्या उद्देशाने आयोगाने हा निकष मागील वर्षी बदलण्याचा निर्णय घेतला. नवीन बदलानुसार प्रवर्गानुसार प्रत्येक पदासाठी १२ पट परीक्षार्थींची निवड करण्यात येणार आहे. त्यानुसार गुणांचा कटआॅफ निश्चित केला जाणार आहे. एखाद्या प्रवर्गातून १२ पट परीक्षार्थी न मिळाल्यास कट आॅफखाली आणला जाईल. तसेच हे परीक्षार्थी त्या प्रवर्गामधील पदांसाठी पात्र ठरतील. सप्टेंबर महिन्यापासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. याविषयी आयोगाचे अध्यक्ष व्ही. एन. मोरे म्हणाले, आयोगाकडून घेतल्या जाणाºया बहुतेक परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिकांची तपासणी करण्याचा ताण कमी झाला आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी संधी देण्याचा विचार होता. नवीन निर्णयानुसारप्रत्यक्षात प्रत्येक पदामागे १५ ते १६ परीक्षार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. यापूर्वी ८ ते १० परीक्षार्थींची निवड केली जात होती.
प्रत्येक पदामागे १२ जणांची होणार निवड, ‘एमपीएससी’च्या नियमांत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 3:41 AM