शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
3
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
4
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
5
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
6
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
7
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
8
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
9
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
10
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
11
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
12
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
13
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
14
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
15
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
17
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
18
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
19
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
20
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

चोवीस तास पाणी कधी?

By admin | Published: May 31, 2016 2:04 AM

उद्योगनगरी असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराची २०४१ची लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचे नियोजन महापालिकेने केले. मात्र, पवना धरणातून पाणी आणण्यास शेतकऱ्यांनी खोडा घातल्याने

पिंपरी : उद्योगनगरी असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराची २०४१ची लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचे नियोजन महापालिकेने केले. मात्र, पवना धरणातून पाणी आणण्यास शेतकऱ्यांनी खोडा घातल्याने, तसेच भामा-आसखेड, आंध्रा धरणामधून दोनशे दलघमी पाणी आणण्याचे नियोजन अद्यापही कागदोपत्रीच असल्याने चोवीस तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न पूर्ण कधी होणार आहे? केंद्र शासनाच्या वतीने सार्वजनिक सुविधा सक्षमीकरण, सुविधांचे सेवा पातळ्यांचे मानांकन निश्चित करण्याचे धोरण आखले गेले. त्यानुसार पुण्यापाठोपाठ जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेत (जेएनएनयूआरएम) पिंपरी-चिंचवड शहरातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले. त्यातून २४ तास पाणी पुरविण्याचे उद्दिष्ट होते. त्यानुसार पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याची योजना पुढे आली. शहराची २०४१ची लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचे नियोजन तत्कालीन आयुक्त दिलीप बंड यांनी केले. शहरास ३७८ दशलक्ष लिटर पाणी आवश्यक होते. त्यानुसार २००८मध्ये बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प आराखडा तयार झाला. गेल्या आठ वर्षांत हा आराखडा पूर्ण झालेला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्षही शहरवासीयांना अनुभवायला मिळत आहे. शहरात कुटुंबांची एकूण संख्या ४ लाख ३० हजार आहे. प्रतिमाणशी प्रतिदिन १८० लिटर पाणी पुरविले जाते. त्यामुळे दिवसाला ३१ कोटी १२ लाख ९१ हजार १०० लिटर पाणी आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचे नियोजन काळाची गरज आहे. केलेले नियोजन अंमलात आणण्याची गरज आहे.बंदिस्त जलवाहिनी झाल्यास शेतीला पाणी मिळणार नाही, अशी भावना झाल्याने मावळातील शेतकऱ्यांनी विरोध केला. आंदोलनात तीन शेतकरी शहीद झाले. शेतकऱ्यांची बाजू समजून न घेतल्याने आंदोलनास हिंसक वळण मिळाले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने भामा आसखेड, आंद्रा धरणामधून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याचे नियोजन केले आहे. आंध्रा धरणातून चाळीस दलघमीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठविला आहे. मावळसारखाच विरोध या भागातही होऊ लागला आहे. शेतीचे पाणी नेऊ नका, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांनी सर्वेक्षण नुकतेच बंद पाडले. तसेच यासाठी अडीचशे कोटी सरकारने माफ करावे, अशी मागणी महापालिकेने केली आहे. यमुनानगर, निगडी परिसरात चोवीस तास पाण्याच्या नियोजनाचा प्रयोग २०१२-१३मध्ये राबविण्यात आला. या भागातील सुमारे पंधरा हजार नळजोडांसाठी ही योजना राबविण्यात आली. मात्र, गेल्या चार वर्षांत शहरात २४ तास पाणी तर दूरच. मात्र, एक वेळही पुरसे पाणी देण्यात महापालिकेला यश आलेले नाही. (प्रतिनिधी)