नारायणगाव : दुचाकी चोरणाºया जुन्नर तालुक्यातील सहा जणांच्या टोळीला नारायणगाव पोलिसांनी गुरुवारी (दि़ २५) जेरबंद करून आठ दुचाकी हस्तगत केल्या, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली़दरम्यान, मंचर, ओतूर, पारनेर या ठिकाणी अशा प्रकारे दुचाकंी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आले आहे़किरण दत्तात्रय भालेराव (वय २४, रा़ कांदळी), अविनाश रामभाऊ गुंजाळ (रा़ डुंबरवाडी, ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे), निखिल विश्वनाथ पवार (वय २०, रा़ कांदळी, ता. जुन्नर, जि़ पुणे), अनिकेत विठ्ठल फापाळे (वय २१, रा़ सुतारठिके कांदळी ता. जुन्नर, जि़ पुणे), पंढरीनाथ खंडू सोनवणे (वय २७, रा़ कांदळी, ता. जुन्नर, जि़ पुणे), विशाल बाळू माळी (वय २१, रा़ पिंपळवंडी, ता. जुन्नर, जि़ पुणे) यांना दि़ २५ जानेवारी २०१८ रोजी दुचाकीचोरांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली़ याबाबत गोरड यांनी दिलेल्या माहितीनुसार दि़ २५ जानेवारी रोजी गोरड पुणे-नाशिक महामार्गावर कांदळी गावच्या हद्दीत १४ नंबर येथे पोलीस गस्त घालत असताना एक जण बिगर नंबर असलेल्या मोटारसायकलसह उभा असलेला दिसून आला. त्यात किरण दत्तात्रय भालेराव नाव असल्याचे सांगून ओतूर येथील अविनाश गुंजाळ याच्या मदतीने बिगर नंबर प्लेटची मोटारसायकल मंचर परिसरातून चोरी केल्याचे सांगितले़या माहितीच्या आधारे पोलिसांनी अविनाश गुंजाळ यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने इतर साथीदार निखिल पवार, अनिकेत फापाळे, पंढरीनाथ सोनवणे, विशाल माळी यांच्या मदतीने मंचर, बेल्हे, रांजणी, गायमुखवाडी, संगमनेर व पारनेर परिसरातून आठ दुचाकी चोरल्याचे कबूल करून त्या दुचाकी वडगाव कांदळी, नारायणगाव परिसरामध्ये विकल्याचे कबूल केले़ पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण आठ दुचाकी हस्तगत केल्या आहेत़ या दुचाकीचोरीबाबत आळेफाटा, ओतूर, मंचर, पारनेर, संगमनेर आदी ठिकाणी गुन्हे दाखल आहे. या गुन्ह्यांच्या तपासकामी विशाल माळी यास पारनेर पोलीस ठाणे, अविनाश गुंजाळ यास ओतूर पोलीस ठाणे, तर किरण भालेराव, अनिकेत फापाळे, निखिल पवार, पंढरीनाथ सोनवणे या चौघांना मंचर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले आहे़ पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अपर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोलीस नाईक आऱ व्ही़ शिंदे, भीमा लोंढे, डी़ आर. पालवे, एस़ के़ कोबल, एऩ आऱ आरगडे, दिनेश साबळे, होमगार्ड गायकवाड या पथकाने गुन्ह्याचा तपास करून दुचाकीचोरी उघडकीस आणली आहे़या दुचाकीचोरांमध्ये मुख्य आरोपी असलेला अविनाश गुंजाळ याच्यावर दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल आहे़ किरण भालेराव एका खासगी कंपनीत काम करत असून त्याच्यावर नारायणगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे़४अनिकेत फापाळे मजुरीचे काम करत असून त्याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात एका खुनामध्ये सहभाग असल्याचा ३०२ चा गुन्हा दाखल आहे़ निखिल पवार आळे येथे एका कॉलेजमध्ये बीसीएसचे शिक्षण घेत आहे़ पंढरीनाथ सोनवणे व विशाल माळी मजुरीकाम करतो.