पुणे : ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्याशी लग्न कर नाहीतर मी तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही, अशी वारंवार धमकी देऊन मानसिक त्रास दिल्यामुळे एका वीस वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. याप्रकरणी एकावर सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
मयत मुलीच्या कुटुंबीयांनी फिर्याद दिल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तरुणीला मानसिक त्रास देणारा व्यक्ती तिच्या घराशेजारी राहातो. ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही. त्याबाबत कुणाला सांगितलेस तर तुला आणि तुझ्या भावाला सोडणार नाही, अशी वारंवार धमकी आणि मानसिक त्रास तो तरुणीला देत होता. त्यामुळे तरुणीने लोखंडी बारला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. डी. बुरगे करीत आहेत.
---------------------