या प्रकरणी १)विजय ऊर्फ कोयत्या गोविंद शेंडगे २)आकाश ऊर्फ बबलू खंडू माशेरे दोघे (रा. आमदाबाद, ता. शिरूर) अशी या आरोपींची नावे आहेत. टाकळी हाजी येथे दि.१८ रोजी दुपारी १२वा.चे सुमारास मळगंगा हॉटेलचे पाठीमागे सर्कल कार्यालयासमोर वाळू व्यवसायाचे तसेच उसने पैशाचे कारणावरून स्वप्निल छगन रणसिंग (वय २४, रा. टाकळी हाजी) याचा व इतर यांनी संगनमत करून दुचाकीवर येऊन पिस्तूलमधून गोळ्या झाडून खून केला व स्वप्निल सुभाष गावडे यास गोळी मारून जखमी करून आरोपी फरार झाले होते. याबाबत मयत स्वप्निल रणसिंग याचे पत्नीने शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार शिरूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
याप्रकरणी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून विजय ऊर्फ पप्पू ऊर्फ कोयत्या गोविंद शेंडगे व आकाश ऊर्फ बबलू खंडू माशेरे यांना शिक्रापूर पुणे-नगर हायवे रोडवरील शिक्रापूर-चाकण चौक येथून ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना शिरूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे. या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, नेताजी गंधारे, अमोल गोरे, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, राजेंद्र थोरात, दत्तात्रय जगताप, शब्बीर पठाण, पोलीस हवालदार विद्याधर निचित, महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड, विक्रम तापकीर, जनार्दन शेळके, काशिनाथ राजापुरे, प्रमोद नवले, पोलीस नाईक राजू मोमीन, मंगेश थिगळे, दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, अक्षय जावळे, प्रसन्न घाडगे यांच्या पथकाने आरोपीचा तपास करून अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास शिरूर पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे करत आहेत.