लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरूच असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. शनिवारी तब्बल २ हजार ५८४ रुग्ण बरे झाले आहेत. तर, दिवसभरात ३ हजार ४६३ रुग्णांची वाढ झाली. विविध रुग्णालयातील ६२१ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ३० हजार ८३२ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६२१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, २ हजार २९४ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ३० मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार १९१ झाली आहे. पुण्याबाहेरील ५ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिवसभरात एकूण २ हजार ५८४ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख १८ हजार ६६३ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या २ लाख ५४ हजार ६८६ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ३० हजार ८३२ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १७ हजार ६३३ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १४ लाख १७ हजार १९४ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.