ऋषीकेश माणिक फासगे (वय १९, रा. सम्राटनगर, दौंड), सोमनाथ जगन्नाथ ढवळे (वय २२, रा. भीमनगर, दौंड) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी: तुकाईनगर येथील लोकाशेड येथे शिवराम इलेक्ट्रिकल कंपनीचे शेडमधील बजाज कंपनीचे एलएडी लाईट, केबल असा तीन लाख पाच हजार ४४३ रुपयांचा ऐवज अज्ञाताने लंपास केला होता. याप्रकरणी कंपनीचे साईट इन्चार्ज अमलियार जिमालभाई ( रा. तुकाईनगर, दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेले पथक करत होतेे. तपासात फासगे, ढवळे व त्याचे साथीदारांनी हे साहित्य चोरल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. या दोघांना सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचबरोबर या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असून अन्य एक जणाचे नाव समजू शकले नाही. पोलिसांनी एलइडी लाईटचे एकूण २६ नग किंमत रुपये ८७ हजार ७४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. अधिक तपास दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करत आहेत.
३१ दौंड
चोरीप्रकरणातील आरोपींसमवेत हस्तगत केलेले एलइडी व पोलीस पथक.
===Photopath===
310521\31pun_1_31052021_6.jpg
===Caption===
३१ दौंड चोरीप्रकरणातील आरोपींसमवेत हस्तगत केलेले एलइडी व पोलीस पथक.