राहूल वसंत सुपेकर (रा. निघोज पठारवाडी ता. पारनेर, जि. नगर), बाजीराव बाळासाहेब नागरगोजे (रा. चिंचपुर ता. पाथर्डी जि. नगर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
जिल्ह्यात तसेच इतर ठिकाणी एटीएम चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे नारायणगाव हद्दीमधील रात्री पोलीस गस्त करून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी एटीएम आणि बंद फ्लॅटमध्ये चोरीहोवू नये याकडे विशेष लक्ष देत होते. गुरुवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक हिंगे, पोलीस नाईक दिनेश साबळे, पोलीस नाईक शेख, होमगार्ड ठोबळे, सातपुते, पठाण, ताजणे हे गस्त घालत होते. पुणे - नाशिक महामार्गावरील ए.टी.एम होमगार्ड ठोबळे व पठाण हे तपासणी करीत असताना त्यांना एसबीआय बँकेचे एटीएममध्ये अर्धवट शटर लाऊन होते. त्यांच्या हालचाली शंकास्पद वाटल्याने त्यांनी प्रसंगवधान राखून शटर खाली ओढून बंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आतील चोरट्याने लोखडी टॉमी होमगार्ड ठोबळे यांच्या हातावर मारला. या हल्यात ते जखमी झाले. तरीही दोघांनी जीवाची पर्वा न करता शटर खाली ओढून बंद केले. या घटनेची माहिती सहायक पोलिस निरीक्षक गुंड यांना दिली. गुंड हे पोलीस नाईक लोंढे, काळूराम पोलिसांनी दोन्ही आरोपीना ताब्यात घेतले.