शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

कोयत्याचा धाक दाखवून कोंढवा येथील पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला लुटणाऱ्या दोघांना वाईत अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 3:32 PM

पेट्रोल पंपावर जमा झालेली १४ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने नेली होती चोरुन..

ठळक मुद्देगुन्ह्यातील ९ हजार ५०० रुपये, कोयता व मोपेड जप्त

पुणे : पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील रोकड जबरदस्तीने चोरुन नेणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांनी वाई येथून अटक केली आहे. कानिफनाथ विनोद महापुरे (वय २३, रा. नाना पेठ) आणि सोहेल ऊर्फ एस. एम. सलीम मुल्ला (वय १९, रा. शिवाजीनगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यातील ९ हजार ५०० रुपये, कोयता व मोपेड जप्त केली आहे.

कोंढवा येथील एस. के. ऑटो केअर पेट्रोल पंपावरील कर्मचारी २२ डिसेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता कॅश मोजत बसला होता. यावेळी दोघे जण दुचाकीवरुन आले व त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील पेट्रोल पंपावर जमा झालेली १४ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरुन नेली होती. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील व शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होता. तपास पथकातील अंमलदार आदर्श चव्हाण व सुदाम वावरे यांना दोघे संशयित आरोपी हे वाई येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार हवालदा रमेश गरुड, संजीव कळंबे, सुदाम वावरे, आदर्श चव्हाण यांनी वाई येथे त्यांच्या शोध घेऊन दोघांना पकडले. सहायक पोलीस िनरीक्षक चेतन मोरे यांनी आरोपींकडून चोरीस गेलेली रोकड, कोयता व दुचाकी जप्त केली आहे.

टॅग्स :Puneपुणेwai-acवाईPetrol Pumpपेट्रोल पंपtheftचोरीArrestअटकKondhvaकोंढवा