केडगाव: दौंड तालुक्यातील केडगाव येथील दोन सख्या भावांचा अपघातीमृत्यू झाला. अपघाती वेळी दोन्ही भावांना सरपटत गाडीने शंभर फुटावून अधिक लांब पर्यंत ओढत नेले. रस्ता ओलांडत असताना चालत जाणाऱ्या दोन्ही भावांना एकाच वेळी चिरडले. त्यामुळे केडगाव गावावर शोककळा पसरली आहे.
सह्याद्री पत्रा कंपनी जवळ पुणे-सोलापूर हायवे वरून रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने चाललेल्या लाल रंगाच्या अज्ञात इनोव्हा गाडीने दोन भावांना चिरडले. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. कैलास शेळके (वय ५८) व पांडुरंग शेळके (वय ५५) राहणार केडगाव देशमुख मळा ता. दौंड अशी अपघातात मृत्यू झालेल्या भावांची नावे आहेत. कामानिमित्त दोघे पुणे सोलापूर हायवे वरून रस्ता ओलांडताना रात्री रविवारी रात्री ८.०० वाजता अपघात घडला. कैलास शेळके यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व एक मुलगी आहे. तर पांडुरंग शेळके यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. पांडुरंग शेळके हे नागेश्वर विकास सोसायटी केडगावचे सचिव गणेश शेळके यांचे वडील होत. जोरदार धडक देणारा इनोव्हा कारचा चालक अपघातानंतर थांबला देखील नाही. घटनास्थळी ग्रामस्थांनी तात्काळ मदत करत त्यांना यवत ग्रामीण रुग्णालयात हलवले. त्यांना त्या ठिकाणी मृत म्हणून घोषित करण्यात आले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. यवत पोलीस व महामार्ग पोलीस चौफुला यांनी घटनास्थळी भेट दिली.