युवराज अर्जुन डोणे ( वय. २६ ) व अविनाश अर्जुन डोणे ( दोघेही रा. मिरजगाव, कवडेवस्ती, ता. कर्जत, जि अहमदनगर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पथक भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी हवालदार गजानन सोनुने यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पोलीस अभिलेखा वरील घरफोडी चोरी करणारे युवराज अर्जुन ढोणे व अविनाश अर्जुन ढोणे हे कात्रज तलाव, भारती विद्यापीठ या ठिकाणी येणार आहेत. पोलीस पथकाने सापळा रचून दोघांना जेरबंद केले. त्यांची चौकशी चोकशी केल्यावर त्यांच्याकडे असलेली दुचाकीही चोरीची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांना अटक करून करून त्यांची पोलिस कोठडी घेऊन अधिक तपास केल्यावर त्यांनी पुणे शहर व ग्रामीण परिसरात घरफोडी चोरीचे अनेक गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यांच्या कडून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील ४, अलंकार, लोणी कंद, नारायणगाव पोलीस ठाण्यातील प्रत्येकी १ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्या कडून एकुण ९लाख ४० हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सुरेंद्रनाथ देशमुख, गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, सहायक फौजदार आंब्रे, हवालदार किशोर वग्गु, संजय जाधव, उत्तम तारू, चंद्रकांत महाजन, गजानन सोनुने, निखिल जाधव, कादिर शेख, मितेश चोरमोले, समीर पटेल, गोपाल मदने यांनी केली आहे.
--
चौकट
सोलापूर,नगरमध्येही घरफोड्या
सदर आरोपी हे बारामती पोलीस ठाण्यातील ३ घरफोडीच्या गुन्ह्यात, सोलापूर येथील ३, अहमदनगर येथील ३, श्रीगोंदा येथील १, एमआयडीसी अहमदनगर येथील १ घरफोडीच्या गुन्ह्यात पोलीस त्यांचा शोध घेत होते. त्यामुळे ही आंतरजिल्हा घरफोडी करणारी टोळी असल्याचा पोलिसांचा संशय असून त्यांच्या इतर साथीदाराचा तपास पोलिस करत आहेत.