पुणे : स्वत:च्या नावावर कर्ज घेवून ते ओळखीच्या व्यक्तीला वापरण्यासाठी देणे एकास चांगलेच महागात पडले आहे. २ कोटींचे कर्ज घेवून ते परत न करता दुबईत वास्तवास गेलेल्या ठगाला मुंबईतील इमिग्रेशन आॅफ ब्युरोने मुंबई विमानतळावर अटक केली आहे.संदीप संपतराव सस्ते (रा. गुलटेकडी, मुळ रा. फलटण) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत प्रदीप तुकाराम कदम (वय ५१, रा. गुरूगणेश सोसायटी, मार्केट यार्ड) यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मुलगा बँक आॅफ महाराष्ट्रच्या बाजीराव रस्त्यावरील शाखेतून कर्ज घेणार असल्याचे रस्ते याला समजले होते. त्यावेळे त्याने मलादेखील कर्ज घ्यायचे आहे. मात्र त्यासाठी आवश्यक आललेले कागदपत्रे माझ्याकडे नाही. त्यामुळे तुमच्या मुलाच्या नावाने मला २ कोटी रुपयांचे कर्ज काढून द्या. त्या कर्जास मी जामीन राहून स्वत:चे रो हाऊस तारण ठेवतो, असे फिर्यादी यांना सांगून त्यांच्या विश्वास संपादन केला. त्यानुसार फिर्यादी यांच्या मुलाच्या नावावर ३ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज काढून त्यातील २ कोटी रुपये सस्ते याला देण्यात आले. मात्र ते पैसे परत न करता आरोपींची फसवणूक केली.तसेच पैशाची मागणी केली असता सस्ते याने फिर्यादीस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद देण्यात आली आहे. २४ जून २०१३ ते २४ डिसेंबर २०१७ दरम्यान हा सर्व प्रकार घडला.>२८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीसस्ते याने या रकमेचे काय केले. तसेच अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर न्यायालयात हजर राहण्याऐवजी तो दुबईत राहत होता. त्या ठिकाणी तो काय करीत होता व पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली होती. त्यानुसार न्यायालयाने त्याला२८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दोन कोटींची फसवणूक करणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 1:24 AM