शहरात व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे मागिल एक महिन्यात कोरोना रुग्णांची संस्था झपाटयाने वाढत आहे. मात्र शहारात व ग्रामीण भागातील गावात नियमांचे पालन न करता कोणत्याही प्रकारचे सुरक्षित अंतर ठेवले जात नाही. त्यामुळे कोरोना कमी होण्याऐवजी वाढत असून भितीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभिर्याने घेण्याची खरी गरज आहे. भोर शहरात व ग्रामीण भागात एकुण ८७ जण कोरोना पॉझिटीव्ह झाले आहेत तालुक्यात एकुण कोरोनाग्रस्त २३८७ उपचारानंतर घरी सोडलेले २३०० जण आहेत.
स्वॅब तपासलेले १३हजार १३६ जण आहेत. त्यामुळे नागरीकांनी गांभिर्याने घेणे महत्त्वाचे असून प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे. अन्यथा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती आहे.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडयात भोर शहरात व ग्रामीण भागातील गावात कोरोना पॉझिटीव्ह वाढत गेले असून एकून ८७ जण कोरोना पॉझिटीव्ह आहेत. विशेषता भोर शहरात कोरोना वाढत आहेत तर ग्रामीण भागातील गावातही कोरोना शिरकाव होत आहे. कोरोना दिवसेंदिवस वाढत असतानाही नागरिक फारसी काळजी घेताना दिसत नाहीत हाँटेल, दुकान आठवडे बाजारासह सर्वच ठिकाणी मोठया प्रमाणात गदर्दी केली जात आहे. भोर नगरपलिका व पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्याची मागणी होत असुन भोर शहरासह ग्रामीण भागातील गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.त्यामुळे भोर प्रशासनाकडून विविध उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा कोरोना दिवसेंदिवस दिवस वाढ होऊ शकते. याकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे.
--