शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

वेडीवाकडी दुचाकी चालवणे बेतले दोघांच्या जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 6:00 PM

वेगात जात असलेल्या दुचाकीने दुस-या दुचाकीस जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देदुचाकींच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

सहकारनगर : वेगात जात असलेल्या दुचाकीने दुस-या दुचाकीस जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्यावर उपचार सुरू आहे. पुणे-सातारा रस्त्यावर असलेल्या ट्रेझर पार्कजवळ गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.      रोहित दिनेश पाटिल (वय २३, मुळ. नंदूरबार) व उदय गंगाधर पाटील (वय २४, रा. धुळे ) अशी मृत व्यक्तींची नावे आहे. तर, राहुल लोटण कणखर (वय २६) हा गंभीर जखमी झाला आहे. तर दुस-या दुचाकीवरील सन्नी रणजीतकुमार शर्मा (वय ३४, आंबेगाव) याला किरकोळ मार लागला आहे. शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहकारनगर पोलीस ठाण्यात मयत पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा हे मित्रासोबत ट्रेझर पाकर्  येथे जेवण करण्यासाठी गेले होते. जेवणकरुण तो त्याच्या दुचाकीवर ट्रेझर पार्क सोसायटीकडून सातारा रोडने स्वारगेटला येत होते. त्याचवेळी रोहित पाटील व त्याचे दोन मित्र ट्रिपल शीट भरधाव व वेडीवाकडी दुचाकी चालवत आला. त्याने शर्मा याच्या दुचाकीला जोरात ठोकले. ही धडक इतकी भीषण होती की उदय व रोहित यांचा रस्त्यावर पडून जागीच मृत्यु झाला. तर राहुल लोटण हा गंभीर जखमी जखमी झाला. राहुलवर सध्या उपचार सुरू असून फियार्दी किरकोळ जखमी झाल्याने त्याला उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.रस्त्यावरील इतर वाहनचालकांचे लक्ष वेधण्यासाठी तरुण पल्सर, अक्टिव्हा, यामाहासारख्या दुचाकी वेड्यावाकड्या पध्दतीने भरधाव वेगाने चालवताना दिसतात. ट्रीपल गाडी चालवत कर्णकर्कश हॉर्न वाजवणे व तोंडातून विचित्र आवाज काढणे ही अशा तरुणांसाठी क्रेझ बनली आहे. त्यांना इतर वाहन चालकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सरळ शिवीगाळ किंवा दमदाटी केली जात, असल्याचे प्रकारही घडले आहेत. ...........................अपघातात ट्रीपल सीट जाणा-या दोघांचा मृत्यू रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्याने झाला आहे. तर त्यांचा एक साथीदार रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्या परिवाराबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही. अनिल शेवाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक 

टॅग्स :Sahakar NagarसहकारनगरAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू