‘त्या ’सातव्या रुग्णाच्या कुटुंबातील मुलगा,नातवाचा अहवाल 'निगेटिव्ह'; बारामतीकरांना दिलासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 01:58 PM2020-04-18T13:58:16+5:302020-04-18T14:03:53+5:30

सातव्या रुग्णाच्या कुटुंबातील १६ जणांना पुण्यात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. 

Two family members report is 'negative' of 'That' baramati seventh corona patient | ‘त्या ’सातव्या रुग्णाच्या कुटुंबातील मुलगा,नातवाचा अहवाल 'निगेटिव्ह'; बारामतीकरांना दिलासा 

‘त्या ’सातव्या रुग्णाच्या कुटुंबातील मुलगा,नातवाचा अहवाल 'निगेटिव्ह'; बारामतीकरांना दिलासा 

googlenewsNext
ठळक मुद्देबारामती शहरात आजपर्यंत एकूण सात कोरोना बाधित रुग्ण आहेत सापडले...७५ वर्षीय रुग्णाला कोरोना संसर्ग झालाच कसा हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच

बारामती : बारामती शहरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या सातव्या रुग्णाच्या कुटुंबातील १६ जणांना पुण्यात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते . त्यापैकी १४ जणांचा दोन दिवसापूर्वी कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. आणखी दोन हाय रिस्क अहवाल आज मिळाले .त्या रुग्णाचा मुलगा , नातूचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.याबाबत प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी माहिती दिली . त्यामुळे बारामतीच्या नागरिकांवरील टांगती तलवार सध्या तरी दूर झाली आआले होते हे .
शहरात म्हाडा वसाहत परिसरात हा रुग्ण राहतो. तो सातत्याने घरातच असल्याने रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झालाच कसा हा प्रश्न प्रशासन व आरोग्य विभागासमोर उपस्थित झाला होता..त्याच्या कुटुंबातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णासह घरातील सदस्य घराबाहेर गेलेले नाहीत. त्यामुळे त्या ७५ वर्षीय रुग्णाला कोरोना संसर्ग झालाच कसा ,हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे .याबाबत प्रशासन शोध घेत आहे .
शहरात एकूण सातजण आजपर्यंत कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत . सातव्या कोरोना रुग्णाच्या घरातील घरातील ३ मूले , ३ सुना मुलाचे सासू, सासरे,पत्नी व ७ नातवंडे यांचा अहवाल आता  निगेटिव्ह आला आहे .आता सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने बारामतीकरांना दिलासा मिळाला आहे .

Web Title: Two family members report is 'negative' of 'That' baramati seventh corona patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.