पुणे : ४५ व्या ज्युनिअर आणि ३५ व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद जलतरण स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पश्चिम बंगालच्या स्वदेश मंडलने नव्या विक्रमांसह २ सुवर्णपदके पटकावली.म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात रविवारपासून ही स्पर्धा सुरू झाली. ४00 मीटर इंडिव्ह्यिज्युअल मिडले प्रकारात स्वदेशने सकाळच्या हिट्समध्ये २0१७ मधील स्वत:चा विक्रम मोडला. सायंकाळी अंतिम फेरीत आपलाच सकाळचा विक्रम मोडून सुवर्णपदक पटकावले. आज एकूण सात नव्या व्यक्तिगत विक्रमांची नोंद झाली.स्पर्धेचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाले. स्विमिंग फेडरेशन आॅफ इंडियाचे (एसएफआय) सीईओ वीरेंद्र नानावटी, अध्यक्ष व गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, ग्नेनमार्क फाऊंडेशनचे अध्यक्ष ग्लेन सलढाणा, एसएफआयचे जनरल सेक्रेटरी कमलेश नानावटी यावेळी उपस्थित होते.निकाल :१७ वर्षांखालील गट : ४00 मीटर फ्री स्टाईल : मुले : अद्वैत पागे (मध्य प्रदेश) ४ मिनिटे २.0९ सेकंद (नवा विक्रम), विशाल ग्रेवाल ( दिल्ली) ४:८.८९, संजय सी. जे. (कर्नाटक) ४:९.२९.४00 मीटर फ्री स्टाईल मुली : खुशी दिनेश (कर्नाटक) ४:३३.२८, रयना सलढाणा (एसएफआय) ४:३३.९७, प्राची टोकस (दिल्ली) ४:३६.६२.१४ वर्षांखालील गट : ४00 मीटर वैयक्तिक मिडले : मुले : स्वदेश मंडल (बंगाल) ४: ४0.९४ (नवा विक्रम), आर्यन नेहरा (गुजरात) ४:४४.0, शोअन गांगुली (गोवा) ४:४५.१३.
पश्चिम बंगालच्या स्वदेश मंडलला राष्ट्रीय विक्रमांसह दोन सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 6:51 AM