जुन्नर : जुन्नर तालुक्यातील पाडळी गावात जमिनीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारीची घटना घडली. या घटनेत माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र बुट्टे पाटील आणि जुन्नर शहर भाजप अध्यक्ष गणेश बुट्टे यांचाही समावेश आहे. या हाणामारीत ज्येष्ठ वकील राजेंद्र बुट्टे यांचे समोरचे दोन दात तुटले असून दोन्ही गटातील अनेकांना डोक्याला व हातापायांना जबर मार लागला आहे. . दोन्ही बांधकाम व्यावसायिक संतोष कबाडीसह १७ जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र बुट्टे पाटील आणि जुन्नर शहर भाजप अध्यक्ष गणेश बुट्टे यांचाही समावेश आहे. ज्येष्ठ वकील राजेंद्र बुट्टे यांचे या हाणामारीत समोरचे दोन दात तुटले असून दोन्ही गटातील अनेकांना डोक्यात व हाता पायांना जबर मारहाण झाली आहे.
या प्रकरणी जुन्नर पोलिस ठाण्यात दोन्ही बांधकाम व्यावसायिकासह संतोष कबाडीसह १७ जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात ज्येष्ठ वकील व भाजप पदाधिकाऱ्याचा समावेश आहे.
जुन्नर तालुक्यात शेत जमिनीच्या वादातून चुलत भावाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याला चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटनेला काही तास उलटत नाही तोच जबर हाणामारीची नवी घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार; शेतातील रस्ता करण्यासाठी पोकलंडच्या सहाय्याने काम सुरू होते. त्यावेळी हे सगळे आरोपी तिथे आले.त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर दोन्ही गट एकमेकांना भिडले आणि फ्री स्टाईल हाणामारी करत शिवीगाळ करून लोखंडी कुर्हाडीने एकमेकांना मारले. यात हाताने व लाथा बुक्क्यांनीही एकमेकांना मारहाण केली. या धुमश्चक्रीत दोन्ही गटातील अनेकजण जबर जखमी झाले आहेत. जुन्नर पोलिसात दोन्ही गटाच्या 17 जणांवर गुन्हाही दाखल झाला आहे.
परस्पर विरोधी तक्रारीत बांधकाम व्यावसायिक असलेल्या संतोष कबाडीसह आशुतोष संतोष कबाडी, प्रतिक विजय नलावडे, प्रणित विजय नलावडे, सुरेंद्र श्रीराम कबाडी, अनिता संतोष कबाडी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच भाजप शहर अध्यक्ष गणेश प्रल्हाद बुट्टे यांच्यासह आकाश धनंजय बुट्टे, रोहन सुभाष बुट्टे, रोहित जना बुट्टे, शैलेश शरद बुट्टे, प्रल्हाद शंकर बुट्टे, राजेंद्र शरद बुट्टे, शरद शंकर बुट्टे,आप्पासाहेब शंकर बुट्टे, प्रतीक जना बुट्टे, सुमित्रा गणेश बुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे