मंचर : रांजणी (ता. आंबेगाव) येथे दोन गटांमध्ये झालेल्या मारामारीप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात परस्परविरोधात आलेल्या तक्रारींवरून दोन्ही गटांतील २६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब पांडुरंग भोर (रा. रांजणी, माळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी रात्री रांजणी गावाच्या हद्दीत गायकवाड यांच्या सलूनच्या दुकानासमोरील मोकळ्या जागेत व मंचर येथे जमिनीच्या वादावरून फिर्यादी बाळासाहेब भोर यांना मारहाण करण्यात आली.
महादू बाबूराव भोर, मारुती बाबूराव भोर, अविनाश महादू भोर, गणेश महादू भोर, नीलेश शंकर भोर, पंढरी बाळू तळेकर, किरण मथू भोर, वैभव बाळू भोर व इतर ५ ते ६ मुले (सर्व रा. रांजणी) यांनी मंगळवारी रात्री ८.३० वाजता जमिनीच्या वादाच्या कारणावरून बाळासाहेब भोर यांना मारहाण केली. बाळासाहेब भोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी महादू भोर, मारुती भोर, अविनाश भोर,गणेश भोर, नीलेश भोर, पंढरी तळेकर, किरण भोर, वैभव भोर व इतर ५ ते ६ मुले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.महादू ऊर्फ कारभारी बाबूराव भोर (रा. रांजणी) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी सायंकाळी रांजणी गावाच्या हद्दीत विलास गायकवाड यांच्या सलूनच्या दुकानासमोर विजय पांडुरंग भोर, बाळासाहेब पांडुरंग भोर, प्रदीप बाळासाहेब भोर, संदीपबाळासाहेब भोर, जयदीप बाळासाहेब भोर, गुलाब सखाराम भोर, संतोष दत्तात्रय वाघ व इतर ४ ते ५ इसम (सर्व रा. रांजणी) यांनी मारहाण केली. विजय पांडुरंग भोर हे महादू भोर यांच्या अंगावर धावून गेले. तसेच त्यांना मारहाण करून जखमी केले.महादू ऊर्फ कारभारी बाबूराव भोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी विजय पांडुरंग भोर, बाळासाहेब पांडुरंग भोर, प्रदीप बाळासाहेब भोर, संदीप बाळासाहेब भोर, जयदीप बाळासाहेब भोर, गुलाब सखाराम भोर, संतोष दत्तात्रय वाघ व इतर ४ ते ५ इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करीत आहेत.