वाडा : वाडा येथे विनामास्क फिरल्यास, सामाजिक अंतर न राखल्यास २०० रुपयांचा दंड ठेवण्यात आला आहे अशी माहिती सरपंच रघुनाथ लांडगे व ग्रामसेवक मच्छिंद्र मस्के यांनी दिली.
खेड तालुक्यातील वाडा येथे ग्रामस्थांनी कोविड नियंत्रण समिती स्थापन केली. गटविकास अधिकारी अजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सभा घेण्यात आली. या समितीची प्रत्येक सोमवारी व गुरुवारी बैठक घेतली जाणार आहे. पंचेचाळीस वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करणे, त्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, प्रत्येक कुटुंब सर्वेक्षण करण्यासाठी वाडी, वस्ती व गावनिहाय what's app ग्रुप तयार केले जाणार आहेत.
किराणा दुकानदार, भाजीविक्रेते, बेकरीत काम करणारे यांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. कोवीडची लक्षणे दिसत असतील तर टेस्ट करावी. ट्रिटमेंट घ्यावी कोणीही माहिती लपवून ठेऊ नये. सर्वानी सहकार्य करून लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी पोलीस पाटील दीपक पावडे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव सुरकुले, किरण हुंडारे, माजी सरपंच जाकीर तांबोळी, प्राचार्य शिवाजी दुंडे, पंढरीनाथ ओव्हाळ,प्राथमिक शिक्षक, आरोग्य कर्मचारी ,कृषी सहाय्यक, तलाठी व अशा वर्कर्स उपस्थित होते.