आंबेठाण : थंड हवामानातील पीक म्हणून गणल्या जाणाऱ्या मुळा या पीकाचे वजन किती असावे.. फार तर ३०० ग्रॅम, ५०० ग्रॅम... मात्र आंबेठाण येथील शेतकरी विठ्ठल पडवळ यांच्या शेतात चक्क २ किलोचा मुळा सापडला आहे...!प्रामुख्याने रब्बी घेतल्या जाणाऱ्या मुळ्याचे पडवळ यांनी आपल्या तीन गुंठे क्षेत्रात पीक घेतले आहे. त्यांना मुळ्याचे उत्पादन भरघोस मिळत आहे, यात दोन किलो वजनाचा मुळा सापडला असल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे.वाढत्या औद्योगिक भागामुळे नागरीकरण मोठ्या संख्येने वाढले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनाही भाजीपाला पिकविण्याकडे कल वाढला आहे. पडवळ यांनी आपल्या शेतातील तीन गुंठे क्षेत्रात महिको जातीचे बियाणे वापरून मुळा पीक घेतले आहे. मुळ्याचे जमिनीत वाढणारे मूळ आणि वरचा हिरवा पाला यांचा भाजीसाठी उपयोग केला जातो. सध्या मुळा काढणी सुरू आहे, काढणी सुरू असताना एकच मुळा जमिनीत खोलवर गेलेला दिसून आल्याने पडवळ यांनी त्याला व्यवस्थित उकरून बाहेर काढला असता, मुळा साधारण दोन किलो वजनाचा व दीड फूट लांब असल्याचे दिसून आले. आजपर्यंत काढणी झालेल्या मुळ्यामध्ये एकच मुळा एवढा मोठा सापडल्याने पडवळ कुटुंबाने आश्चर्य व्यक्त केले आहे. गावामधील शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे.मुळ्याची जमिनीतील वाढ चांगली होण्यासाठी भुसभुशीत जमिनीची निवड केली. भारी जमिनीची चांगली मशागत केल्याने मुळ्याचा आकार वेडावाकडा न होता, पांढरा व सरळ असल्याने बाजारात मागणी चांगली आहे. मुळा लागवड केल्यावर त्याला ठिबक सिंचनद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाण्याची बचत होऊन, पीकही भरघोस आल्याने उत्पन्न चांगले मिळत आहे. तीन मुळ्यांच्या एका गड्डीला दहा रुपये मिळत आहेत. बाजारात विक्री न करता किरकोळ विक्रीतून चांगले पैसे मिळत आहेत. तीन गुंठे क्षेत्रात साधारण खर्च वजा जाता सात हजार रुपये फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.
दोन किलोचा मुळा पाहिलाय? पुण्यातील आंबेठाण येथील शेतकऱ्याने घेतले यशस्वी उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 3:08 PM
ड हवामानातील पीक म्हणून गणल्या जाणाऱ्या मुळा या पीकाचे वजन किती असावे.. फार तर ३०० ग्रॅम, ५०० ग्रॅम... मात्र आंबेठाण येथील शेतकरी विठ्ठल पडवळ यांच्या शेतात चक्क २ किलोचा मुळा सापडला आहे...!
ठळक मुद्देपडवळ यांनी तीन गुंठे क्षेत्रात महिको जातीचे बियाणे वापरून घेतले मुळा पीकमुळा साधारण दोन किलो वजनाचा व दीड फूट लांब असल्याचे आले दिसून