लोकमत न्यूज नेटवर्क
भिगवण : कोरोनाचा आलेख खाली आल्याने निर्बंध शिथिल होताच पुणे सोलापूर महामार्गावर अपघातांचा आलेख उंचावत आहे. भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवसात तीन अपघात घडले. यात दोन जण ठार तर तर ११ जण जखमी जखमी झाल्याची घटना गुरूवारी (दि २४) पुणे सोलापूर महामार्गावर हे अपघात घडले असून यातील पहिल्या अपघातात दोन दुचाकी सामोरा समोर धडक झाल्याने प्रवीण बापू खोत (वय २९ रा.पळसदेव) यांचा मृत्यू झाला. पोंधवडी गावाच्या हद्दीत घडलेल्या दुसऱ्या अपघातात मोटार ट्रकला पाठीमागून धडकली. यात दत्ता पांडुरंग घोडके (वय ३० रा.मेदनकरवाडी, चाकण) याचा जागीच मृत्यू झाला. तर आनंद घोडके (वय २६), निशा घोडके (वय २४), छाया घोडके (वय ५०), अश्विन घोडके (वय २२), सुदर्शन घोडके (वय २४), ऋणधावणी कामत (वय ५०), आकांशा इटके (वय ३० रा.सर्वजण चाकण) हे जखमी झाले. तर तिसरा अपघात डाळज गावच्या हद्दीत घडला असून यात पिकअप गाडीने पुढची गाडीला पाठीमागून ठोस दिल्याने झालेल्या अपघातात पिकअप चालक बालाजी जलचंद्र माने (वय ४५ रा.आंबेजवळगे), विजय बिभीषण शिंदे जखमी झाले. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या अपघातात पाठीमागून ठोस देणाऱ्या चालकाविरोधात रहदारीचे नियम मोडून अविचाराने वाहन चालवित अपघात घडविला म्हणून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
चौकट
पुणे सोलापूर महामार्गावर अवैधरित्या वाहने उभी केल्यामुळे अपघातांची संख्या वाढत आहेत. मात्र, महामार्ग प्रशासन मात्र टोल वसूल करण्यात व्यस्त आहे. वाहन धारकांच्या सुरक्षेसाठी असणारे पेट्रोलिंग युनिट आणि महामार्ग पोलीस अवैधरित्या पार्किंग केलेल्या वाहनावर कोणतीही कारवाई करत नाही.
फोटो