अवसरी (पुणे) : शिंगवे येथील पाबळेमळा येथील शेतकरी बाळू काशीनाथ पाबळे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना बिबट्याची दोन लहान बछडे सापडले.
बाळू पाबळे यांची पाबळे मळ्यात ऊस शेती असून, दोन दिवसांपासून उसाची तोड सुरू आहे. आज ऊसतोडणी कामगार ऊस तोडण्यासाठी आले असता त्यांना दोन बिबट्यांची पिल्ले त्यांना मिळून आली.
याबाबत त्यांनी तत्काळ शेतकऱ्याला सांगितले असता शेतकऱ्यांनी याबाबत वनविभागाला कळविले वनविभागाचे अधिकारी दहातोंडे, काचारे यांनी तत्काळ घटनास्थळी येत पिल्लांना सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे.