शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

पुणे मेट्रोची दोन स्थानके पुणेरी पगडीच्या आकारात!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 4:15 AM

२ हजार कोटींचे कर्ज मंजूर : डिसेंबरमध्ये रेल्वे धावणार

- विश्वास खोड नवी दिल्ली : पुणेमेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी फ्रान्सच्या बँकेचे २ हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. नदीजवळची डेक्कन जिमखाना आणि संभाजी पार्क ही स्थानके पुणेरी पगडीच्या आकारात असतील, ही स्थानके पेठ व पुण्याच्या नव्या भागाला जोडणारी असतील. मेट्रोमुळे पुण्याची नवी ओळख जगाला होईल, अशी माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सोमवारी दिली.दीक्षित म्हणाले की, ‘पुणे मेट्रो प्रकल्पासाठी २ हजार कोटींचा करार होणे हा आज ऐतिहासिक क्षण आहे. यानंतर ४ हजार कोटींच्या कर्जाचा करार पुढच्या महिन्यात होईल. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेसोबत तो करार केला जाईल. एकूण ११ हजार ४०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. त्यातून सुमारे ६ हजार कोटी रुपये कर्जातून येतील. अन्य खर्च केंद्र व महाराष्ट्र सरकार उचलेल. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकाही वेगळ्या स्वरुपात खर्च उचलणार आहेत. तो इक्विटी फायनान्सच्या आणि जमिनीच्या स्वरुपात सहभागी आहे.’ मेट्रो रेल्वे २०२०-२०२१ पर्यंत सुरू करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. डिसेंबर २०१९ पासून पहिला टप्पा सुरु करता यावा असा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.ठाणे, नाशिकमध्येही मेट्रो?नागपूर व पुण्यानंतर आणखी कोणती शहरे महामेट्रोच्या दृष्टिपथात आहेत, असे विचारले असता दीक्षित म्हणाले की, ठाणे महानगरपालिकेने मेट्रोचा प्रकल्प तयार करण्याची जबाबदारी आम्हाला दिली होती. त्याचा आराखडा आम्ही दिला आहे. नाशिक शहरामध्येही मेट्रो रेल्वेचा प्रकल्प अहवाल बनविण्याच्या सूचना महाराष्ट्र सरकारने केल्या होत्या. तो लवकरच दिला जाईल.

टॅग्स :Metroमेट्रोPuneपुणे