लोणी काळभोर : वडकी (ता. हवेली) येथील गोडाऊनवर सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या संजय औताडे याने सुपरवायझर मधूकर धुमाळ यांचा धारदार कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना रविवार (१९ नोव्हेंबर २०१७) रोजी घडली होती. खून करून फरार झालेल्या दुसऱ्या आरोपीस गुन्हे शोधपथकाने महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर जेरबंद केले असून सदर खून धुमाळ हे मित्राला वारंवार कामावरून काढून टाकण्याची धमकी देत असल्याचे कारणावरून केला असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.या प्रकरणी बांधकाम मिस्त्री म्हणून काम करणारे नारायण बाबूराव दाभाडे (वय २९, रा. किष्किंधानगर,खंडोबा मंदिराजवळ, कोथरूड, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मधुकर दशरथ धुमाळ (वय ४५, रा. महादेवनगर, मांजरी, हडपसर, पुणे) यांचा खून झाला होता. खूून करून दोघे संजय रामचंद्र औताडे (वय २४) व महेश अजय धुमाळ (वय २६, दोघे रा. दहावा मैल, ग्रेटिंग हॉटेलमागे, वडकी, ता. हवेली) हे दोघे खून करून फरार झाले होते. औताडे हा मंगळवार (२१ नोव्हेंबर) रोजी उरुळी कांचन येथे येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत गुन्हे शोधपथकाला मिळाली होती. त्यानुसार उरूळी कांचन रेल्वेस्थानक परिसरात सापळा रचून त्याला जेरबंद करण्यात आले होते. त्याचा साथीदार महेश अजय धुमाळ हा त्याच्या मूळ गावी (मु. पो. मंगरुळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) असल्याची बातमी मिळताच त्याला तेथे जाऊन सापळा रचून अक्कलकोट पोलिसांच्या मदतीने २४ जानेवारीला जेरबंद करण्यात आले.सहा पोलीस निरीक्षक महानोर, समीर चमनशेख, रॉकी देवकाते, दिगंबर साळुंके यांनी सापळा रचून पकडण्यात यश आले.
खून करून फरार झालेल्या दुुुुसरा आरोपीही जेरबंद; महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 6:00 PM
वडकी (ता. हवेली) येथील गोडाऊनवर सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या संजय औताडे याने सुपरवायझर मधूकर धुमाळ यांचा धारदार कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना रविवार (१९ नोव्हेंबर २०१७) रोजी घडली होती.
ठळक मुद्देसापळा रचून अक्कलकोट पोलिसांच्या मदतीने २४ जानेवारीला करण्यात आले जेरबंदरविवार (१९ नोव्हेंबर २०१७) रोजी घडली होती खून केल्याची घटना