शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लाखोंची चोरी करणाऱ्या दोघांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 7:11 PM

व्यापा-यांस लॉजचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या खिशातील ४० हजार रुपयांची चोरी केली होती.

ठळक मुद्देपुणे शहर हद्दीत अशाप्रकारचे १२ गुन्हे दाखल

लोणी काळभोर : जामिनावर सुटलेले दोघे लोकांना लुटण्यासाठी बुलेट व होंडा युनिकॉर्न दुचाकीवरुन येवून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या हातात हात देवून, त्यांच्याशी झटपट करून, कुस्तीच्या डावाचा वापर करून खिशातील पैसे लुटणाऱ्या दोघांना  पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने थेऊर फाटा येथे जेरबंद केले आहे.      स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अक्षय भारत जगताप ऊर्फ काठाळे ( वय २०, रा. जयमल्हार कॉलनी, गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक, मूळ.बीड ) व प्रभू ऊर्फ आकाश बाळू धुमाळ ( वय २०, सध्या रा. रामोशी आळी, हडपसर, मूळ- जि. सोलापूर ) या दोघांना अटक केली आहे. या दोघांनी शिरूर, रांजणगांव, भिगवण येथील आठ ठिकाणी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एकट्या इसमाला गाठून ३ लाख ६ हजार रुपये रक्कम लुटल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी या दोघांनी गुन्ह्यात वापरलेली बुलेट ( क्र एमएच.१२. एलजी ९१९२ ) व होंडा युनिकॉर्न क्र. एमएच १२ पीजी ९१९३) या दोन दुचाकी जप्त केल्या असून त्यांच्याकडून लुटमार केलेल्या रक्कमेपैकी २ लाख ५० हजार रुपये हस्तगत केले आहेत.            शिरूर येथील कपिल ट्रेडर्स या दुकानासमोर १९ नोव्हेंबर २०१७  बुलेट मोटारसायकल वरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी कपिल सुरेश बोरा ( रा. शिरूर ) या व्यापा-यांस लॉजचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या खिशातील ४० हजार रुपयांची चोरी  केली होती. त्यानंतर शिरूर येथील माणिकचंद हॉस्पिटल समोर, रामआळी, पाबळफाटा, डंबेनाला, इंदिरा गांधी पुतळा चौक, रांजणगांव येथे गजानन हॉस्पिटल समोर व भिगवण येथे बुलेट व होंडा युनिकॉर्न दुचाकीवरुन येवून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या खिशातील रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.            शिरूर शहरात भरदिवसा या घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गुन्हेगारांचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. सदर गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने ते उघडकीस आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाची नियुक्ती केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , यापूर्वी पुणे शहर परिसरात याप्रकारचे गुन्हे केलेले व जामिनावर बाहेर असलेल्यांची माहिती मिळवली असता त्यांना पुणे शहर हद्दीतील मार्केटयार्ड, सहकार नगर, लष्कर, भारती विद्यापीठ, भोसरी, चंदननगर या पोलीस ठाण्यात अशाप्रकारचे १२ गुन्हे दाखल असलेले लक्षात आले. या गुन्ह्यात जामिनावर बाहेर असलेले जगताप व धुमाळ यांचे फोटो गुन्हे घडलेल्या सीसीटिव्ही फुटेज मधील फोटोशी जुळत असल्याने पथकाने त्यांचा माग काढण्यास सुरूवात केली. दोघे गुरूवारी ( २२ मार्च ) रोजी थेऊर फाटा येथे आले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना जेरबंद केले.पुढील तपासासाठी दोघांना शिरूर पोलिसांचे ताब्यात देण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिसtheftचोरी