पुणे - जुना बाजाराजवळील शाहीर अमर शेख चौकात रेल्वेच्या हद्दीतील मोठे होर्डिंग कोसळून चौघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी रेल्वेच्या अभियंता आणि एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
संजय सिंग असे अभियंत्याचे तर पांडुरंग वनारे असे अटक करण्यात आलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी ठेकेदार मलिक्कार्जुन मलकापुरे, उपठेकेदार जीवन मांढरे तसेच सांगडा काढण्याचे काम करणाऱ्या मजूरांविरूद्ध पोलिसांकडून सदोष मनुष्यवधाचा (भादंवि ३०४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एम. मुजावर यांनी दिली.
पुण्यात होर्डिंग कोसळून झालेल्या भीषण अपघाताचं CCTV फुटेज
जखमी झालेल्यांपैकी चार जण गंभीर असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना इतकी भयंकर होती की घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. घटनास्थळावरील नागरिकांनी तातडीने जखमींना रिक्षात घालून ससून रुग्णालयात दाखल केले. विशेष म्हणजे हे होर्डिंग अनधिकृत असून ते धोकादायक असल्याचे पुणे महापालिकेच्या आकशचिन्ह विभागाने रेल्वे प्रशासनाला 2013 पासून वेळोवळी पत्र पाठवून सांगितले होते. मात्र त्यांची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. हे होर्डिंग खुपच कमकूवत झाल्यावर रेल्वे प्रशासनाने ते पाडण्याचे काम शुक्रवारी दुपारी हाती घेतले होते. यावेळी होर्डिंग गॅस कटरच्या सहाय्याने खालच्या बाजूने कापत असताना ते सिग्नलवर थांबलेल्या सहा रिक्षा , एक कार व दोन दुचाकींवर पडले.
Pune Hoarding Collapse: रेल्वे प्रशासनानं मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत
शाहीर अमर शेख चौकामध्ये 40 बाय 40 फुट अशा उंचीची दोन अनधिकृत होर्डिंग आहेत. ही दोन्ही होर्डिंग रेल्वेच्या हद्दीत असल्याने रेल्वेच्या मालकीची आहेत. यातील एक धोकादायक होर्डिंग पाडण्याचे काम रेल्वेने ठेकदाराला दिले होते. मात्र याची कोणतीही कल्पना महापालिका तसेच वाहतूक विभागाला देण्यात आली नाही. दुपारी एकच्या सुमारास काम सुरु करण्यात आले होते. यावेळी होर्डिंग दोरीने मागच्या बाजूला दगड व लोखंडी वजनाला बांधण्यात आले होते. तर दुसरीकडे गॅस कटरच्या सहाय्याने होर्डिंग थेट खालूनच कापण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी रस्तावरील वाहतूक सुरुच होते. दुपारी दोनच्या सुमारास चौकातील सिग्नल सुटल्यावर सिग्नलला थांबलेली वाहने निघून गेली. मागून आलेली वाहने सिग्नलला येताच सिग्नल लागला. यावेळी सहा रिक्षा , एका स्विफ्ट डिझायर कार आणि एक अॅक्टिव्हा व एक बाईक तेथे थांबली होती. यावेळी अचानक 40 बाय 40 फुटाचा फेक्स त्यांच्यावर पडला.