पुणे: तुमच्या नावाने मुंबईवरून पाठवलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडल्याचे सांगून महिलेसह एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनवर आधी कुरिअर ऑफिसमधून आणि नंतर मुंबईहून सायबर पोलीस बोलत असल्याचे सांगत महिलेला १८ लाखांचा गंडा लावला आहे.
- सोमेश्वरवाडी भागात राहणाऱ्या ३९ वर्षीय महिलेने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनोळखी क्रमांकावरून संपर्क करून तुमच्या नावाने पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये ड्रग्ज आहेत. तसेच १ लॅपटॉप, ५ पासपोर्ट, दोन क्रेडिट कार्ड आणि कपडे असा मुद्देमाल आहे. तुम्हाला कारवाई टाळायची असेल तर लगेच पोलिसांना तक्रार करा. त्यानंतर अटकेची भीती दाखवून त्यातून सोडवण्याचा बहाणा करून ५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
- पाषाण परिसरात राहणाऱ्या ३४ वर्षीय युवकाने चतुःशृंगी पोलिसांत फिर्याद दिलीय हे. तुमचा कॉल मुंबई येथे नार्कोटिक्स सेलला जोडून देतो सांगून डीसीपी बोलत असल्याचा बनाव केला. तुमचे आधार कार्ड दहशतवादामध्ये वापरले गेले आहे. खाते व्हेरिफाय करण्यासाठी एक लिंक पाठवली. त्यावर तुमच्या बँक खात्यातील सर्व रक्कम नार्कोटिक्स डिपार्टमेंटच्या बँक खात्यावर पाठवा त्याची चौकशी करून आम्ही तुम्हाला ती परत पाठवू, असे सांगितले. चोरट्यांनी सांगितल्याप्रमाणे महिलेने भीतीपोटी एकूण १२ लाख ८८ हजार रुपये पाठवले. याप्रकरणी अज्ञात मोबाइलधारकाच्या विरोधात चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिस निरीक्षक नांद्रे पुढील तपास करत आहेत.
अशी घ्या काळजी
- तुम्ही पार्सल पाठवले नसल्यास घाबरू नका.- असा फोन आल्यास सर्वांत आधी सायबर पोलिसांना कळवा.- कोणतेही ॲप्लिकेशन डाऊनलोड करू नये.- कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.