लोणी काळभोर : लक्झरीमध्ये प्रवासी भरण्यासाठी दरमहा १ लाख ५० हजार रुपयांची केलेली मागणी धुडकावल्याच्या कारणावरून चिडून तिघांनी मालकास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लक्झरी बसवर दगडफेक करून दोन जणांना गंभीर जखमी केले. पुणे-सोलापूर महामार्गावर मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी एकाला अटक केली आहे.
गोविंद बद्रिनाथ चव्हाण (वय २७, रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अल्ताफ शब्बीर मोमीन (रा. गंगा व्हिलेज सोसायटी, हांडेवाडी रोड, हडपसर) रूपेश गव्हाणे ऊर्फ बॉबी (रा. सातवनगर, दुग्गड चाळ, जेएसपीएम कॉलेज रोड, हांडेवाडी रोड, हडपसर) व शाहरूख हुसेन खान (वय २४, रा. सय्यदनगर, हांडेवाडी रोड, हडपसर) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शाहरूख खान याला अटक केली आहे.
फिर्यादी चव्हाण हे दत्ता कानिफनाथ देवकर यांच्या लक्झरी बसवर चालक म्हणून काम करतात. देवकर हे गेली ७ ते ८ वर्षांपासून रवीदर्शन, गाडीतळ, हडपसर येथून आपल्या लक्झरीत प्रवासी बसवून पुढील प्रवासासाठी गाडी चव्हाण यांच्या ताब्यात देतात. शनिवार (३ नोव्हेंबर) पासून वरील तीन जण देवकर यांना ते आपल्या बसमध्ये प्रवासी भरत असताना येथे गाडी भरण्यासाठी आम्हाला १ लाख ५० हजार रुपये द्या, अशी मागणी वारंवार करत होते. परंतु, देवकर यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने ते त्यांच्यावर चिडून होते. यामुळे तिघे दिवेकर यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यावेळी चव्हाण तेथे उपस्थित होते.४शुक्रवार (९ नोव्हेंबर) रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास देवकर यांनी आपली लक्झरी बसच्या क्रमांक एमएच ०४ जी ९५६० मध्ये हडपसर ते उमरगाया मार्गावरील प्रवासी भरले. चव्हाण सदर गाडी घेऊनदीडच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतीलकवडीपाट टोलनाका ओलांडून पुढे आले.४त्यावेळी त्यांच्यामागून एका गाडीतून मोमीन, गव्हाणे व खान आले. त्यांनी आपली गाडी लक्झरीला आडवी लावून ती थांबवली. चव्हाण यांना तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली व गाडीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामुळे गाडीच्या काचा फुटल्या. चव्हाण यांना गाडीच्या बाहेर ओढून पैशांची मागणी, शिवीगाळ, दमदाटी केली.४दगडफेकीत ड्रायव्हर चव्हाण यांच्या पायास तर महिलाप्रवासी सुनीता हिंगमिरे यांचे पायास दगड लागला. तिघेही पळून जावू लागले. क्लीनर बळीराम प्रकाश जगताप याने शाहरूख खान यास पाठलाग करून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.