पुणे : उरुळी कांचन नजीक शिंदवणे गावात मारुती कंपनीची ब्रिझा(एमएच.१२.पीझेड.२८२७) ही कार विहिरीत पडली. त्यात काळेशिवार वस्तीवरील विहिरीत कार पडली असताना त्यात अडकलेल्या दोन जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. हा अपघात गुरुवारी सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान घडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती उर्फ दादा बबन खेडेकर (वय ६०, रा.खेडेकरमळा )व सौ. सोनाली गणेश लिंभोणे (वय २२, रा. काळेशिवार वस्ती, शिंदवणे) अशी या अपघातातील घटनेत मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याबाबत मिळालेली माहिती अशी की काळेशिवार वस्ती, शिंदवणे येथील छगन लिंभोणे यांच्या घराजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या चौकोनी आकाराच्या विहीरीत ही गाडी पडल्याने हा अपघात झाला आहे. छगन लिंभोणे यांची सुन सोनाली ही गाडी शिकण्यासाठी गाडी चालवायला बसली होती गाडीत मारुती उर्फ दादा बबन खेडेकर हे अपंग ग्रुहस्त डाव्या बाजूला बसले होते, गाडी चालू झाल्यावर सोनालीला अंदाज न आल्याने आणि गाडी नियंत्रणासाठी ताबा न राहिल्याने गाडी सरळ विहीरीत सुमारे २० खोल पाण्यात बुडन त्यात गुदमरुन त्या दोघांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती कळाल्यावर स्थानिक लोकांनी व मिलिंद मेमाणे , वैजनाथ कदम, सागर कांचन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले , सोमनाथ चितारे आदींनी परिश्रम घेऊन जे.सी.बी व क्रेनच्या सहाय्याने गाडी व म्रुतदेह बाहेर काढले. लोणी काळभोर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.
उरुळी कांचन येथे कार विहिरीत पडून दोन जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 7:45 PM
उरुळी कांचन येथे मारुती कंपनीची ब्रिझा(एमएच.१२.पीझेड.२८२७) ही कार विहिरीत पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैैवी घटना शिंदवणे येथे घडली.
ठळक मुद्देविहिरीत कारमध्ये अडकलेल्या दोन जणांचा गुदमरून मृत्यू