चाकण - येथील संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या आवारात एका अठरा वर्षाच्या युवकावर पूर्व वैमनश्यातून धारदार शस्राने वार करून व डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली असून या हल्ल्यात दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना आज ( दि. १५ ) आठ वाजण्याच्या सुमारास चाकण येथील संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या आवारात घडली. अनिकेत संदीप शिंदे ( वय १८, रा. चाकण, ता.खेड, जि. पुणे ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या हल्ल्यात ओंकार मनोज बिसणारे ( वय १७, रा.चाकण ) व आणखी एकजण गंभीर जखमी झाले आहेत. ओंकार वर येथील जयहिंद हॉस्पिटल मध्ये उपचार चालू असून दुसऱ्या जखमीचे नाव व उपचारासाठी नेण्यात आलेल्या हॉस्पिटलचे नाव अद्याप समजले नाही. अनिकेत हा गॅस रिपेअरिंगच्या दुकानात असताना काही तरुण आले व गोडीत बोलून किल्ल्याच्या आवारात नेले.त्याठिकाणी या अनोळखी तरुणांनी त्याच्या चेहऱ्यावर, गळ्यावर धारदार शस्राने सपासप वार केले व डोक्यात दगड घालून हत्या केली. अनिकेतचा मृतदेह चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.
चाकण येथील संग्रामदुर्ग किल्ल्यात युवकाचा खून, हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 10:28 PM