पुणे : सावकारी करणाऱ्या अजय जयस्वाल यांची हत्या करणाऱ्यादोघा मारेकऱ्यांना भारती विद्यापीठ पोलिसांनीअटक केली आहे.विनायक ऊर्फ चिंटू कुमार कुर्तकोटी (वय २८, रा़ मेगा सिटी, कोथरुड) आणि अविनाश दीपक जाधव (वय २१) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत़. पैशाच्या वादातून हा खुन करण्यात आल्याचा संशय सुरुवातीला पोलिसांना होता़. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी हे आरोपी कोथरुडच्या चांदणी चौकात येणार असल्याची माहिती मिळाली होती़. पोलिसांनी तेथे सापळा रचून दोघांना पकडण्यात आले़. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी खुन केल्याची कबुली दिली आहे़. भिशी चालवत व खासगी सावकारी करीत असलेल्या अजय जयस्वाल यांची आर्थिक वादातून व एका महिलेकडे वाकडी नजर असल्याच्या संशयावरुन हा खुन करण्यात आला होता़.कात्रज येथील वाघजाईनगरमधील विष्णु शांती व्हिला सोसायटीमध्ये त्यांचा बंगला असून तेथे ते सुट्टीसाठी येत होते़. नेहमीप्रमाणे ते शनिवारी ते बंगल्यामध्ये आले होते़. त्यानंतर सोमवारी त्यांच्या कर्मचाऱ्यानी फोन केला़ पण त्यांनी तो उचलला नाही़. त्यामुळे ते बंगल्यात आले तर बंगल्याला बाहेरुन कुलूप लावले होते़. परंतु, त्यांची मोटार घराबाहेरच उभी असल्याचे त्यांच्या कर्मचाऱ्याच्या लक्षात आले़. संशय आल्यामुळे त्याने बंगल्याच्या खिडकीमधून आतमध्ये पाहिल्यावर जयस्वाल हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले होते़. त्यानंतर त्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांना कळविले होते.
पुण्यात सावकराची हत्या करणारे मारेकरी जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 12:09 PM