शहरं
Join us  
Trending Stories
1
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
2
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
3
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
4
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
5
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
6
₹८०००० कोटींची फोडणी, मुकेश अंबानींच्या कंपनीला २ दिवसांत मोठं नुकसान; का झालं असं?
7
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?
8
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
9
Navratri Puja Vidhi 2024 :घटस्थापना आणि घट उत्थापन याचा शास्त्रोक्त विधी जाणून घ्या!
10
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
11
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
13
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
14
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
15
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
17
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
18
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
19
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
20
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश

मोठ्या व्यावसायिकाकडे ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 9:21 PM

औंध येथे रक्कम देण्यासाठी आरोपींनी व्यावसायिकाला बोलावले आणि रक्कम स्वीकारताना खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून दोघांना रंगेहाथ पकडले.

पुणे : 'पचास लाख रूपये दे नहीं तो ठोक दूंगा, कल तक पैसे रेडी रखना, मैं जो बोल रहा हूं वह सुननेका, पैसे का इंतजाम रखनेका, पोलीस को पता लगा तो अंजाम जानता है, तेरा खानदान तो पुरा गया..'अशा शब्दांत एका अनोळखी फोनवरून मोठ्या व्यावसायिकाला धमकी देत 50 लाख रूपयांची खंडणी मागितली.

औंध येथे रक्कम देण्यासाठी आरोपींनी व्यावसायिकाला बोलावले आणि रक्कम स्वीकारताना खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून दोघांना रंगेहाथ पकडले. त्यातील एक व्यावसायिकाकडे पूर्वी चालक म्हणून काम करीत होता आणि त्याने 2016 मध्ये काम सोडले असल्याचे समोर आले आहे.

अजुहरददीन शेख (वय 24; रा; शाहूनगर चिंचवड, मूळ पश्चिम बंगाल) आणि संतोष देवकर ( वय 32 रा. शाहूनगर चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांची कंपनी आणि कन्ट्रकशनचा व्यवसाय आहे. गेल्या आठवड्यात (दि.16 ) त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला आणि त्यांच्याकडे 50 लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. तक्रारदारांनी तत्काळ खंडणी विरोधी पथकाकडे धाव घेतली. याबाबत पोलिसांचा तपास सुरू होता. आरोपींनी पुन्हा फोन करून त्यांना रक्कम कुठे आणून द्यायची याची जागा सांगितली. औंध येथे त्यांना पैसे आणण्यास सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि अजुहरददीन शेख याला पैसे स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंझाड, श्रीकांत चव्हाण, कर्मचारी विनोद साळुखे, शैलेश सुर्वे, प्रदीप शितोळे,  सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, प्रवीण पडवळ, आशा कोळेकर, प्रदीप गाडे, संपत अवचरे, विजय गुरव, राहुल उत्तरकर, संग्राम शिनगारे, अमोल पिलाने, भूषण शेलार, मोहन येलपल्ले, चेतन शिरोळकर आणि रूपाली कर्णवर या पथकाने केली आहे.-------

स्वत:चे कर्ज फेडण्यासाठी आरोपीने रचला कट संतोष देवकर हा पूर्वी व्यावसायिकाकडे चालक म्हणून काम करीत होता. त्याच्या सांगण्यावरून अजुहरददीन शेख याने व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी पिंपरी चिंचवड मध्ये शोध घेऊन त्यालाही पकडले. व्यावसायिकाने संतोष यास वेळोवेळी आर्थिक मदत केलेली होती. त्यांची आर्थिक आणि मानसिक परिस्थितीचा अंदाज घेत स्वत:चे कर्ज फेडण्यासाठी त्याने हा कट रचला असल्याची कबुली पोलिसांना दिली.-------------------------

टॅग्स :PuneपुणेArrestअटकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी