पुणे: पुण्यातील प्रसिद्ध ओशो आश्रमातील दोन भूखंड विक्रीला काढले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणी वाढलेले असल्यामुळे हा प्लॉट विकायचा निर्णय घेतला गेला आहे असा दावा ओशो आश्रमाच्या वतीने करण्यात येतो आहे. पण ओशो यांच्या भक्तगणांनी भक्तगणांनी या सगळ्या प्रकारावर संताप व्यक्त केलाय.
पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे रजनीश उर्फ ओशो यांचा मोठा आश्रम आहे. झुरिच मधील ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन यांची मालकी असलेला हा आश्रम जगभरातल्या लोकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. देश-विदेशातून अनेक लोक या ठिकाणी येत असतात. या केंद्रांमधील दोन मोठे भूखंड विक्रीसाठी काढण्यात आले आहेत. यासाठी परवानगी मिळावी म्हणून ऊन इंटरनॅशनल च्या वतीने धर्मादाय आयुक्त कार्यालयात अर्ज करण्यात आला आहे. एकूण दीड एकर प्रत्येकी असे हे दोन भूखंड असून ते रिकाम्या जागेत असल्याचे ओशो इंटरनॅशनल च्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.
यासाठी तीन मोठ्या उद्योग दिन कडून बोली लावण्यात आली होती. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि पंचशील रियालिटी चे संचालक अतुल चोर्दिया तसेच ए टू झेड ऑनलाइन सर्विसेस या सगळ्यांनी यासाठी बोली लावली होती. सर्वाधिक रक्कम ही या जागे शेजारी ज्यांचा बंगला आहे त्या राजीव बजाज यांनी लावली आहे. तब्बल एकशे सात कोटींना त्यांनी हे भूखंड विकत घेण्याची तयारी दाखवली आहे. धर्मादाय आयुक्तांकडून परवानगी मिळाल्यानंतर ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
........
...म्हणून भूखंड विकू नका; ओशोंच्या अनुयायांची आर्त हाकओशो आश्रमचे दोन भूखंड १०७ कोटी रुपयांत विकणार आहेत. मात्र, ही जागा ओशोच्या भक्तांची जागा आहे. ती जागा पूर्ण जगातून आलेल्या ओशो अनुयायांनी बनवली आहे. तसेच येथे ओशोची समाधी आहे. मात्र, कोविडमध्ये आश्रम बंद होते. त्यामुळे आश्रमचा आर्थिक खर्च उचलणे अवघड आहे. या कारणास्तव आम्ही ते विकत आहोत, असे ओशो ट्रस्टने सांगितले आहे. आश्रमकडे ६ कोटी रुपये अजून आहेत. मात्र ओशो आश्रम अडचणीत असेल तर तुम्ही अनुयायांकडे या. ते नक्कीच आर्थिक मदत करण्यास तयार आहेत. - योगेश ठक्कर, ओशो अनुयायी. ....
................भूखंड विकणे हे पूर्ण षडयंत्र...
पुण्यातील ओशो आश्रमाचे भूखंड विकणे हे पूर्ण षडयंत्र आहे. मात्र, ओशोंच्या आश्रमाचे सर्व हक्क मुख्यालय स्विझर्लंड येथे दिले आहे. त्या ठिकाणच्या ट्रस्टचे नावही ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन आहे. त्यांचे एका वर्षाचे आर्थिक उत्पन्न ४० ते ५० कोटी आहे, असे त्यांनी खूप वर्षांपूर्वी सांगितले होते. आता तर त्यात नक्कीच वाढ झाली असणार आहे. तेच भारतात आले तर भूखंड विकण्याची गरज भासणार नाही. आम्ही ओशोंच्या आश्रमाचे भूखंड अजिबात विकू देणार नाही. त्याविरुद्ध आम्ही न्यायालयात हक्क लढा देणार आहोत.- ओशो अनुयायी.