शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

दावडी खून प्रकरणातील ‘ त्या ’ दोन पोलिसांचे अखेर निलंबन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 8:12 PM

दावडी येथे पीडित मुलीच्या भावावर चालत्या बसमध्ये कोयत्याने वार करत त्याचा निर्घृण खून करण्यात आला होता. तसेच मृतदेह ताब्यात घेण्यास संतप्त जमावाने नकार देत पोलिसांनी या प्रकरणात निष्काळजीपणा दाखविला असल्याचा ठपका ठेवला होता.

ठळक मुद्देचौकशी अहवालात कर्तव्यामध्ये निष्काळजीपणाचा ठपका पोलिसांनी दुर्लक्ष करून आरोपीकडून कारवाई न करण्यासाठी आर्थिक व्यवहार

दावडी : दावडी येथील तरुणाच्या खूनप्रकरणी कर्तव्यामध्ये निष्काळजीपणाचा ठपका ठेवून खेड पोलीस ठाण्यामधील ‘त्या’ दोन पोलिसांचे अखेर निलंबन करण्यात आले. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी केली आहे. खेड तालुक्याच्या पूर्व भागात कार्यरत दावडी बीट पोलीस नाईक डी. वाय. सावंत, ए. डी. उबाळे या दोघांना निलंबित केले आहे. दावडी येथील आरोपी अजित भगवान कान्हुरकर हा एका पीडित मुलीला त्रास देत होता. वारंवार घरी येऊन मुलीला छेडणे, तिचे फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर व फेसबुकवर पोस्ट करणे यामुळे खेसे कुटुंब त्रस्त झाले होते. याबाबत खेड पोलीस ठाण्यात दोन वेळा तक्रार दिली होती. मात्र, या प्रकरणाकडे या पोलिसांनी दुर्लक्ष करून आरोपीकडून कारवाई न करण्यासाठी आर्थिक व्यवहार केला होता. त्यामुळे आरोपीचे अजुनच फावले होते. पुन्हा पुन्हा पीडित मुलीचे फोटो व्हायरल करून या मुलीची व कुटुंबांची बदनामी करत होता. दरम्यान खेड पोलीस ठाण्यात आरोपी अजित यांच्याविरुद्ध (८ जून) रोजी फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला होता. आरोपी हा आमच्या मुलीला वारंवार त्रास देतो. त्याला अटक करा, समज द्या, अशी मागणी खेसे कुटुंबियाने पोलिसांकडे मागणी केली होती. मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्याने आरोपी मोकाट फिरत होता. गुन्हा दाखल केला म्हणून चिडून १२ जूनला सकाळी साडेसातला पीडित मुलीचा भाऊ श्रीनाथ सुदाम खेसे यांच्यावर चालत्या एसटी बसमध्ये कोयत्याने वार करून खून केला. श्रीनाथ यांच्या नातेवाईकांनी व दावडी गावातील ग्रामस्थांचा खेड पोलीस स्टेशन समोर मोठा जमाव जमला होता. पोलिसांनी आरोपीला लवकर पकडले असते तर श्रीनाथचा जीव गेला नसता, त्या पोलिसांना तत्काळ निलंबित करा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका संतप्त झालेल्या नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतली होती. सुमारे तीन तास श्रीनाथ यांचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोरच होता. आरोपीला न पकडता आरोपीकडून या पोलिसांनी पैसे घेऊन मोकाट सोडले, त्यांना तातडीने निलंबित करा, अशा घोषणा स्टेशनसमोर देण्यात आल्या होत्या. दरम्यान, अप्पर पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते यांनी खेड पोलीस ठाण्यात येऊन या प्रकरणाबाबत पोलीस कर्मचारी दोषी आढळले तर त्यांना निलंबित करण्यात येईल, असे आश्वासन संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांना दिले होते. पोलीस कर्तव्यावर होते, त्यांनी निष्काळजीपणा केला, असा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला होता. सदर प्रकरणाची चौकशी खेड उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे यांनी पूर्ण करून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्याकडे अहवाल सादर केला होता. या अहवालावरून ही कारवाई करण्यात आली आहे.  

टॅग्स :KhedखेडMurderखूनCrimeगुन्हाPoliceपोलिसsuspensionनिलंबन