शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
3
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
4
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
5
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
6
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
7
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
8
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
9
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
10
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
11
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
12
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
13
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
15
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
16
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
17
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
18
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
19
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
20
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार

Lalit Patil: ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला पळून जाण्यात मदत करणारे दोन पोलीस बडतर्फ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 12:52 PM

पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघे ललीत पाटील सोबत एक्सरे साठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर आले आहे...

पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला ससून हास्पिटलमध्ये एक्स रे साठी घेऊन जाणारे आणि तो पळून गेल्याची माहिती नियंत्रण कक्षास तीन तास उशीरा देणाऱ्या दोन पोलिसांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याच्या गृह विभागाने या दोन पोलिसांना बडतर्फ केले आहे.

पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघे ललीत पाटील सोबत एक्सरे साठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. या शिवाय घटनेची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षास दिली असती तर पळून गेलेल्या ललीत पाटील ला पकडता आले असते परंतु या दोघांनी वरिष्ठ अधिकारी तसेच नियंत्रण कक्षास न कळवल्यामुळे ललीत पाटील याला पळून जाण्यास वाव मिळाला असे चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे.

ड्रग तस्करीच्या गुन्ह्यात कारागृहात असताना आजारपणाचे नाटक करून ससून रुग्णालयात राहून ड्रग्ज तस्करीच्या व्यवसायात सक्रिय असणार्‍या कुख्यात ललित पाटील याच्यासह चौदा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) पुणे पोलिसांच्‍या गुन्‍हे शाखेने तब्‍बल ३ हजार १५० पानांचे दोषारोपत्र दाखल केले होते. याप्रकरणी मोक्‍का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्‍ही. आर. कचरे यांच्‍या न्यायालयात हे आरोपपत्र दाखल झाले होते.

दोषारोपपत्राच्या माध्यमातून पुणे पोलिसांनी महत्त्वपूर्ण ठोस पुरावे जप्‍त केले होते. ड्रग्ज प्रकरणात मोक्‍का लागून दाखल झालेले हे पहिले आरोपपत्र असल्‍याचे बोलले जात आहे. ड्रग्ज तस्‍करीतील मास्‍टर माईंड ललित अनिल पाटील (३७, रा. नाशिक), अरविंद कुमार प्रकाशचंद्र लोहरे (रा. मुंबई, मूळ रा. उत्तरप्रदेश), अमित जानकी सहा उर्फ सुभाष जानकी मंडल (२९, रा. पुणे), रौफ रहीम शेख (१९, रा. ताडीवाला रोड, पुणे), भूषण अनिल पाटील (३४, रा. नाशिक), अभिषेक विलास बलकवडे (३६, रा. नाशिक), रेहान उर्फ गोलू आलम सुलतान मोहम्मद अन्सारी (२६, रा. मुंबई, मूळ रा. उत्तरप्रदेश), प्रज्ञा अरुण कांबळे उर्फ प्रज्ञा रोहित माहीरे (३९, रा. नाशिक), जिशान इक्बाल शेख (रा. नाशिक), शिवाजी अंबादास शिंदे (४०, रा. नाशिक ), राहुल पंडित उर्फ रोहित कुमार चौधरी उर्फ अमित कुमार (३०, रा. विरार, मूळ रा. बिहार), समाधान बाबूराव कांबळे (३२, रा. मंठा, जि. जालना), इमरान शेख उर्फ आमिर अतिक खान (३०, रा. धारावी), हरिश्चंद्र उरवादत्‍त पंत (२९, रा. वसई पालघर) यांच्‍यावर ड्रग्ज तस्‍करी प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

दाखल दोषारोपपत्रानुसार, ससूनमध्ये ड्रग्जचे रॅकेट चालवत असताना पुणे पोलिसांनी कारवाई करत २ कोटी १४ लाखांचे ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर ललित पळून गेल्यानंतर या गुन्ह्याची व्याप्ती वाढली. या निमित्त अवैध पद्धतीने सुरू असलेले संपूर्ण ड्रग्ज जगत या कारवाईमुळे ढवळून निघाले. ससून सारख्या रुग्णालयातून अशा पद्धतीने रॅकेट चालवले जात असल्‍याचा प्रकार समोर आल्‍यानंतर ससून रूग्णालयातील कर्मचारी, कर्तव्यावर असलेले पोलिस, कारागृह पोलिस, कारागृहातील डॉक्‍टरसह, ससून रूग्णालयातील डॉक्‍टरचा ललित पाटील याला पळून लावल्याप्रकरणी संबंध आला होता.

टॅग्स :Lalit Patilललित पाटीलPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड