शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

दोन सोसायट्यांमध्ये सात घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 3:23 AM

पुणे शहरात विशेषत: उपनगरांमध्ये होणाऱ्या घरफोडीचे सत्र चालू असून, दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे़

पुणे/धनकवडी : पुणे शहरात विशेषत: उपनगरांमध्ये होणाऱ्या घरफोडीचे सत्र चालू असून, दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे़ नागरिकांची घरे, दुकाने फोडली जाऊन लाखो रुपयांचा ऐवज चोरटे लंपास करताना दिसून येत आहे़ कात्रज व आंबेगाव बु. परिसरातील दोन वेगवेगळ्या सोसायट्यांमधील एकूण ७ फ्लॅट फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा माल लंपास केल्याच्या घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आल्या आहेत. चोरी करण्यासाठी चोरटे मोटारीतून आल्याचे निष्पन्न झाले आहे़याप्रकरणी विनायक लालासाहेब जाधव (वय ४६, रा़ चंद्राई कॉम्प्लेक्स, आंबेगाव बु.) व धीरज जीवरामभाई धांडालिया (वय २५, रा़ तोरणा क्लासिक, नारायणी धाम) या दोघांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़धीरज जीवरामभाई धांडालिया हे तोरणा क्लासिक इमारतीतील फ्लॅट क्रमांक सी १० मध्ये राहण्यास आहेत. चोरट्यांनी त्यांचा फ्लॅट फोडून त्यातील एक कुलर व रोख रक्कम असा १० हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला़या इमारतीत चोरी करण्यासाठी आलेले चोरटे हे मोटारीतून आल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासातनिष्पन्न झाले आहे. तर याच इमारतीतील आणखी तीन फ्लॅट चोरट्यांनी फोडले आहेत. परंतु, फ्लॅटधारक हे बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या फ्लॅटमधूननेमके काय चोरीला गेले, याची माहिती अद्याप पोलिसांना माहिती मिळाली नाही़४पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक जाधव हे धायरी येथील घरी गेले होते़ त्यांचा फ्लॅट कुलुप लावून बंद असताना चोरट्यांनी कुलुप उचकटून त्यांच्या घरात प्रवेश करुन १० तोळे सोन्याचे दागिने व ५० हजार रुपये रोख असा १ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. जाधव यांच्या इमारतीतील तिसºया मजल्यावरील सुधीरसिंग दलबीरसिंग राणा यांचा फ्लॅट फोडून ५० हजार रुपये रोख, एक कॅमेरा व कॅमेºयाची लेन्स असा माल चोरून नेला़ तसेच ज्ञानराज सखाराम तळेकर यांचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. या इमारतीतील तीन फ्लॅट फोडून चोरट्यांनी एकूण ३ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.