राहुल डंबाळे म्हणाले,
दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने अनुयायी अभिवादनाला येत असतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरी बसून अभिवादन करावे, असे आवाहन केले आहे. त्यादिवशी प्रातिनिधिक स्वरूपाचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी पक्ष संघटना प्रतिनिधी आणि नागरिकांना पासेस दिले आहेत. आतापर्यंत १ हजार २०० पासेस नागरिकांना दिले आहेत. पुढील दोन, तीन दिवसात हजार पासेस जाण्याची शक्यता आहे. एक जानेवारीला सकाळी ७ ते १२ यावेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. त्याचप्रमाणे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन कार्यक्रम होतील. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, आनंदराज आंबेडकर, प्रा. जोगेंद्र कवाडे, भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद, भाई विवेक चव्हाण उपस्थित राहणार आहेत.